धार्मिक

वसंत पंचमीच्या प्रेत्येक आईने करा हा छोटासा उपाय आपली मुले बुद्धिमान होतील.

नमस्कार मित्रांनो तुमचा मुलगा किंवा मुलगी अभ्यासात हुशार व्हावे असे वाटत असेल म्हणजे त्यांनी कोणतेही काम केले तरी त्यांनी एकाग्रतेने करावे आणि त्यामध्ये त्यांना प्राविण्य मिळावे असे जर तुम्हाला आई म्हणून वाटत असेल तर हा आजचा लेख खास तुमच्यासाठीच आहे.

येत्या २६ जानेवारी ला वसंत पंचमी आणि ह्या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या जिभेवर जर हे एक अक्षर जर काढले तर त्याचा सकारात्मक परिणाम मुलांवर होईल, मुले बुद्धिशाली होतील. त्याचबरोबर मुलांची एकाग्रता देखील वाढेल.

हे अक्षर कोणते आहे कसे काढायचे कधी काढायचे हे आपण जाणून घेऊयात. मित्रांनो ह्या वसंत पंचमीला श्री पंचमी तसेच ज्ञानपंचमी देखील बोलतात. हि वसंत पंचमी गुरुवारी २६ जानेवारीच्या दिवशी आलेली आहे.

ह्याच दिवशी विद्येची व ज्ञानाची देवता माता सरस्वती ब्रह्मदेवांच्या मुखातून प्रकट झाली असे म्हणतात. त्याचमुळे माता सरस्वस्तीची पूजा केली जाते. तसेच ह्या दिवशी माता सरस्वस्तीची पूजा केल्याने तुमची एकाग्रता देखील वाढते. ज्ञानाचे उपासक वसंत पंचमीच्या दिवशी विधिपूर्वक पूजन करत असतात.

ह्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे असे बोलले जाते. वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त हा माघ शुक्ल पंचमी २५ जानेवारी दुपारी १२:३४ मिनीटांनी सुरु होऊन २६ जानेवारी सकाळी १०:२८ मिनीटांनी समाप्त होईल मात्र उदय तिथीनुसार २६ जानेवारीला हा सण साजरा केला जाईल. ह्या दिवशी आपण पूजा सकाळी ७ वाजल्यापासून सकाळी १०:२८ मिनटांपर्यत करायची आहे. वसंत पंचमीपासूनच वसंत ऋतूची सुरवात होते.

ह्या दिवशी कोणत्याही शुभ कार्य करण्यासाठी सुरवात करणे चांगले मानले जाते. ह्या दिवशी तुम्ही मुलांकडून जर अक्षर अभ्यास करून घेतला तर तो त्या मुलांच्या फायद्याचा ठरतो. त्यांच्या बौद्धिक विकासासाठी फायदेशीर ठरतो.

तसेच ह्या दिवशी लहान मुलांना प्रथम अन्न प्राशन करण्याचा विधी अर्थात उष्टावण देखील करू शकता. म्हणजे तुमच्या घरात जर छोटे बाळ असेल. आणि त्याला तुम्हाला पहिल्यांदा अन्नाचे प्राशन करायचे असेल तर तुम्ही ह्या दिवशी करू शकता. आईच्या दुधाकडून त्याला अन्नाकडे न्याचे असेल तर हा दिवस उत्तम आहे.

आता पाहुयात ते अक्षर जे तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवर काढायचे आहे. तुमचा मुलगा लहान असो किंवा मोठे असतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा. आपण आपल्या मुलांच्या जिभेवर आपण ऐं हे अक्षर काढायचे आहे. ऐं हे अक्षर बुद्धी, वाणी, ऐश्वर्य देणाऱ्या माता सरस्वस्तीचा बीजमंत्र आहे.

ह्या बीजमंत्राचा उच्चार करणारा नेहमी विद्वान होतो म्हणूनच आईवडिलांनी मुले लहान असतील तर आपल्या मुलांच्या जिभेवर आपण चांदीच्या चमच्याने किंवा डाळिंबाच्या काडीने किंवा अनामिकेने आपण मधाच्या साह्याने आपण ऐं हे अक्षर लिहायचे आहे. तसेच तुम्ही तांदळाने भरलेल्या ताटलीमध्ये सुद्धा लहान मुलांकडून हे अक्षर तुम्ही काढून घेऊ शकता.

त्याचबरोबर तुम्ही ओम श्री हि अक्षरे देखील काढू शकता. त्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास चांगला होतो. मुलांनी ह्या दिवशी शिक्षणाला सुरवात केली तर मुलांना माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो. आणि हा आशीर्वाद मिळाल्यामुळे त्यांची वाणी शुद्ध होते तसेच त्यांचे अभ्यासात मन देखील लागते आणि ते प्रगतीची नवनवीन शिखरे देखील गाठतात.