आरोग्य

रात्री जागरण करणाऱ्यांना आणि उशिरा झोपणाऱ्यांना अनेक आजारांचा धोका ,जाणून घ्या लवकर झोपणे का महत्वाचे आहे…

मित्रानो आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी वेळेवर झोप महत्वाची आहे आणि पुरेश्या प्रमाणात झोप घेतल्याने आपलं शरीर हे निरोगी बनतं. तसेच आपल्यापासून आजारपण दूर निघून जातात.रात्री जागरण केल्याने आणि उशिरा झोपल्याने आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

आपल्याला कमीत कमी ८ तास झोप घेणे हे गरजेचे असते.आपल्या शरीराला उशिरा झोपण्याची आणि जागरण करण्याची एक प्रकारे सवयच लागलेली आहे. पण या सवयीमुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो.आपण वेळेवर झोपणे का गरजेचे आहे ते जाणून घेऊयात.

रात्री लवकर झोपण्याचे फायदे:-

१)हार्मोन्स नियंत्रित राहतात:-

आपल्या शरीरातील हार्मोन्स हे ताणतणावाशी जोडले गेलेले असतात. हार्मोन्स योग्यरीत्या काम करत असतील तर आपले शरीर उत्तम राहण्यास मदत होते. तसेच आआपण लवकर झोपलो तर आपला तणाव देखील कमी होतो आणि हार्मोन्स नियंत्रित राहतात.हार्मोन्स नियंत्रित असले तर आपले आरोग्य देखील उत्तम राहत.कारण रात्रीच्या जागरणामुळे आपल्याला तणाव निर्माण होतो आणि त्याचा परिणाम आपल्या हार्मोन्स वर होतो.

२)रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते :-

आपण लवकर झोपल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.आपली झोप पुरेशी झाली तर आपल्या पांढऱ्या पेशी तयार होतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.कारण पांढऱ्या पेशी ह्या आपल्याला होणाऱ्या आजाराशी लढण्याचं काम करत असतात.त्यामुळे आपण जर लवकर झोपलो तर आपण राजर्षी लढू शकतो.

३)मानसिक आरोग्य चांगलं राहत:-

रात्री लवकर झोपल्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.रात्री पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अनावश्यक चिंता आणि नैराश्य निर्माण होते.तसेच रात्री लवकर झोपल्यामुळे आपल्या मेंदूला शांतता मिळते आणि आपण आपल्या समस्यांना सामोरे जाऊ शकतो .

४)आरोग्य उत्तम राहते:-

आपण रात्री लवकर झोपल्यामुळे आपल्या आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.रात्रीची झोप चांगली झाली तर आपला मूड देखील चांगला राहतो आणि आपल्याला दिवसभर ताजेतवाने देखील वाटते.रात्री लवकर झोपल्यामुळे हृदयविकार ,शुगर,बी. पी. आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत नाही.

५)भुक नियंत्रणात राहते:-

आपल्या शरीराला पुरेशी झोप न मिळाल्यामुळे भूक हि नियंत्रणात राहत नाही. त्यामुळे भरपूर प्रमाणात खाल्लं जात आणि वजन देखील वाढते.आपल्या शरीराचे वजन वाढल्यामुळे अनेक आजार निर्माण होतात.तसेच रात्री लवकर झोपणे आपल्या शरीराला योग्य आहार करायची सवय लागते.तसेच आपली भूक देखील नियंत्रणात राहते.