लाईफस्टाईल

तुमची पण डाळ कुकर करताना शिट्टीतून बाहेर पडते का ? मग ह्या टिप्स वापरून पहा.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण काही कुकर लावताना कोणती काळजी घ्यावी व सोप्या सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत जेणेकरून तुमच्या कुकर मधून पाणी बाहेर येणार नाही. बऱ्याच स्त्रियांची कंप्लेंट असते कि त्या जेव्हा कुकर ला डाळ लावतात तेव्हा एक शिट्टी झाली कि त्यातून भरपूर पाणी येते, व त्यामुळे गॅसजवळ आणि स्वयंपाकघरात सर्वत्र घाण होऊन जाते. शिवाय डाळ व्यवस्थित शिजत नाही किंवा खूप वेळा ती जळते. तुम्हाला देखील अश्या समस्येला तोंड द्यावे लागत असेल तर आजचा लेख खास तुच्यासाठीच आहे चला तर जाणून घेऊयात कि अश्या त्या कोणत्या तुम्ही चुका करत आहात व तुम्ही कोणत्या चुका टाळायला हव्यात.

 

कुकर मध्ये डाळ लावताना गोष्टी लक्षात ठेवा- कुकरमधून डाळ बाहेर येण्याचे नेमकं कारणे कोणती आहेत, त्यातील पहिले कारण म्हणजे डाळ बनवताना कुकरमध्ये तुमच्या कुकर च्या क्षमतेपेक्षा जास्त डाळ भरली तर तुम्हाला अशी समस्या येऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे कुकर मध्ये डाळ कमी व पाणी जास्त झाले तर त्या पाण्याबरोबरच शिट्टी वाजल्यानंतर डाळ बाहेर येते. तिसरे कारण हे आहे कि जर आपण कूकर लावला मात्र जर गॅस हा मोठा ठेवला तरी अशी समस्या होऊ शकते.

कुकरमध्ये डाळ जळण्याची करणे कोणती ?

कुकरला डाळ लावण्यापूर्वी ती आपण गरम पाण्यात साधारण १५ मिनिटे भिजत ठेवावी. कुकरमध्ये डाळ लावल्यावर त्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून ती डाळ आपण चमच्याने हलवावी. जर डाळ कुकर ला चिटकून जर राहिली तर ती जळते. आणि सर्वात महत्वाचे डाळ शिवजताना गॅस हा मंद आचेवर असावा नाहीतर डाळ जळून जाण्याची शक्यता असते. कुकर मध्ये कुठे लिकेज किंवा हवा जात असेल जेणेकरून कुकर मध्ये प्रेशर निर्माण होत नाही आणि अश्यावेळी देखील डाळ शिजत नाही. त्यातून पाणी बाहेर येते.

डाळ जळू नये किंवा कुकर मधून पाणी बाहेर येऊ नये म्हणून काही टिप्स:

कुकर ची रबर ढिली असेल किंवा लूस असेल तर, कुकर ची शिट्टी व्यवस्थित जर बसवलेली नसेल तर ह्यामुळे कुकर मध्ये आत प्रेशरच निर्माण होत नाही. म्हणून डाळ व्यवस्तिथ शिजत नाही.

अश्या काही डाळी आहेत ज्यांना शिजायला वेळ लागतो म्हणून त्या डाळी शिजवण्याआधी त्यांना १ तास आधी भिजू ठेवा, तसेच तुम्ही डाळ कुकर ला लावताना त्यांना चिमूटभर सोडा देखील टाकू शकता. ज्यामुळे डाळ पटकन शिजेल वेळ लागणार नाही.

डाळ शिजवताना आपण कुकर मध्ये त्या डाळी सोबत मीठ, हळद आणि एक छोटा चमचा तेल किंवा तूप टाका, ह्यामुळे होत काय तर डाळ लवकर शिजते तसेच तेलकटपणामुळे डाळ कुकर ला चिटकत नाही.

डाळ शिट्टीमधून बाहेर येऊ नये म्हणून तुम्ही कुकरच्या टोपणाला आतून तेल लावा तसेच तुम्ही आधी सांगितले तसे अर्ध चमचा तेल आपण त्या डाळ लावताना कुकर मध्ये टाका, ज्यामुळे डाळ हि शिट्टमधून येणार नाही व चांगली शिजेल.

तर मित्रांनो ह्या होत्या काही खास गृहिणींसाठी टिप्स मला खात्री आहे कि ह्यातील टिप्स तुम्हाला नक्कीच कामी येतील, आजचा लेख आवडला असेल तर लाइक व शेयर जरूर करा, धन्यवाद.