धार्मिक

तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देणारा, तुळजापूरचा चिंतामणी दगड जाणून घ्या त्यामागील रहस्य.

मित्रांनो आजकाल व्यक्ती कितीही वैचारिक झाला तरी त्याच्या मनात संभ्रम निर्माण करणारे प्रश्न हमखास पडतात अश्या वेळी त्याच्या मनात एकच काहूर माजते आणि मग आपण त्या प्रश्नाच्या समाधानासाठी मार्ग शोधू लागतो. मनातील ह्याच सर्व गोंधळाची उत्तरे एक दगड देतो असे तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसने थोडे अवघड असले तरी हे खर आहे. आज एकविसाव्या शतकात जरी हे शक्य नसले तरी ह्या दगडामागील कहाणी सत्य आहे. ह्या गोष्टीबद्दलच आपण आज जाणून घेऊयात.

आपल्या महाराष्ट्रातील एका मंदिरात हा दगड आहे, आणि आधी सांगितल्याप्रमाणे ह्या दगडावर आपण हात ठेवला कि रहस्यमय रित्या आपल्या मनातील प्रश्नाचे उत्तर हा दगड त्याचवेळी देतो. ह्याचे वैशिष्ट जाणून घेण्याचा अनेक वैज्ञानिकांनी प्रयत्न केला मात्र कोणालाही आजपर्यँत त्याचे रहस्य उलघडले नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा दगड एखाद्या व्यक्तीचे मन जाणून कस काय त्याचे उत्तर देत असेल असा प्रश्न अजून देखील आहे. मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल कि आम्ही हे कोणत्या दगडाबद्दल बोलत आहोत, तर मित्रांनो आम्ही हे बोलत आहोत ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर शहराबद्दल सांगत आहोत.

इथे माता तुळजाभवानीचे मंदिर आहे, हे मंदिर म्हणजे साडेतीन पीठांपैकी एक मंदिर आहे. त्यामुळे इथे हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये विशेष महत्व दिले गेले आहे. नवरात्रात इथे मोठा उत्सव जमतो आणी भक्तांची गर्दी जमते. नावरत्रात इथे अगदी भक्तांचा महापूर आला कि काय असे भासते. तुळजापूर तीर्थ हे समुद्रसपाटीपासून सुमारे २६०० फूट असून. भवानी मातेचे मंदिर हे बालेघाटाच्या कडे पठारावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची कुलदैवत म्हणजे हि तुळजापूरची भवानी माता.

तसेच संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून विशेष मान दिला जातो, भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील काही शिल्प हे हेमांगपंथी असून इथे नारदमुनींचे दर्शन देखील घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. ह्या तीर्थापासून समोरच गोमुख तीर्थ लागते, त्यातून अगदी २४ तास पाण्याचा प्रवाह असतो, त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप सोळा खांबी असून पश्चिम दिशेला त्याचा गाभारा आहे. हे मंदिर पाच माजली आहे.

ह्या मंदिराचे दोन भागात विभाजन झाले आहे. धर्मदर्शन आणि मुखदर्शन, गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर बसलेली भवानी मातेची मूर्ती गंडकीशिळेची असून तिने विविध शस्त्र धारण केली आहेत. मंदिराच्या पाठीमागे हा दगड आहे त्याला आपण चिंतामणी दगड असेही म्हणतो. हा चिंतामणी दगड सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. फक्त आपल्याला ह्या चिंतामणि दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हात ह्या दगडावर ठेवायचे आहेत. ह्यानंतर आपण आपल्या मनातील प्रश्न आपण आपल्या मनातच विचारावा.

ह्यानंतर जे घडते त्यावर आपला विश्वासच बसत नाही, त्याचे होते असे कि जर आपल्या प्रश्नाचे उत्तर जर हो असेल तर तो दगड उजव्या बाजूला होतो आणि जर उत्तर नाही असेल तर तो डावीकडे होतो. आणि जर दगड जागीच राहिला तर अजून आपल्या प्रश्नाचे उत्तर आले नाही आपण प्रतीक्षा करावी असा ह्याचा अर्थ असतो. मित्रांनो तुम्ही देखील हा अनुभव नक्की घ्या. मात्र हा दगड उजवीकडे किंवा डावीकडे कसा बरा होतो ह्याचे तथ्य कोणालाही आतापर्यंत उलघडले नाही.

हे सर्व तुळजाभवानी मातेची एक चमत्कार आहे असे समजले जाते, तर मित्रांनो आजचा लेख कसा वाटला ते आम्हला नक्की कळवा तसेच जर तुम्ही ह्या दगडाचा अनुभव घेतला असेल तर आम्हाला देखील तुमचा अनुभव काय होता ते कॉमेंट करून सांगा, धन्यवाद.