नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे खूप स्वागत आहे, आजचा लेख हा किचन टिप्स बद्दल आहे आजच्या लेखाचा विषय आहे कि बटाट्याला पटकन शिजवण्यासाठी पद्धत आणि तो हि एकदम सुरक्षित. मित्रांनो बटाटा हा प्रेत्येकाला खायला आवडतो अशी एखादीच व्यक्ती असेल कि ज्याला बटाटा खायला आवडत नाही, आपण बटाट्याच्या अनेक वेगगवगेळ्या प्रकारच्या रेसिपी बनवतो, जसे कि वडा असेल, आलू चाट असेल, किंवा सामोसा असेल इत्यादि. ह्या सर्व प्रकारच्या रेसिपी साठी आपल्याला बटाटा लागतो आणि त्याला आपण शिजवून घेतो.
बटाटे शिजवण्याची अनेक पद्धती आहेत जर तुम्ही बटाटा हा जर मायक्रोवेव्हमध्ये पॉलिथिनच्या पिशवीत टाकून जर शिजवत असाल तर असे करणे ताबडतोब थांबवा कारण मायक्रोवेव्हच्या उष्णतेमुळे खूप हानिकारक विषारी पदार्थ बाहेर पडतात, जे आपल्या आरोग्याला घातकदायी ठरू शकते. आजच्या लेखात आपण बटाटे उकडण्याचे काही उपाय सांगणार आहोत जे अजिबात घातक नाहीत सर्व काही सुरक्षित आहेत.
ह्या प्रकारे बटाटे उकळल्यास ते लगेच उकडतात.
जर तुम्हाला बटाटे कढईत शिजवत असाल तर बटाटे सोलून ते सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवा आणि नंतर आपण कढईत पाणी गरम करायला ठेवा व नंतर त्यात बटाटे घालून १५ मिनिटे उकळावे, १५ ते २० मिनिटे उकळू दिल्यानंतर ते उकडलेले आहेत कि नाहीत ते चेक करण्यासाठी आपण एखादा चमचा घेऊन त्यात दाबून पहा चमचा दाबला गेला तर समजावे कि तुमचा बटाटा शिजला आहे. त्यानंतर तो बटाटा आपण बाहेर काढून आपल्याला जी काही रेसिपीसाठी लागणार आहे त्यासाठी आपण तो वापरा.
तुम्ही बटाटे हे प्रेशर कुकरमध्ये उकडू शकता, प्रेशर कुकरमध्ये उकडण्यासाठी त्या बटाट्यांना धुवून घ्या व नंतर ते प्रेशर कुकरमध्ये ठेवा नंतर आपण त्यात एक पेला पाणी टाका आणि मध्यम आचेवर ठेवा, दोन ते तीन त्याच्या शिट्ट्या होऊदेत, ह्या पूर्ण प्रोसेस नंतर तुम्हाला बटाटे उकडलेले दिसतील.
जर तुम्ही बटाटे हे मायक्रोवेव्हमध्ये शिजवणार असाल तर सर्वप्रथम त्यांना धुवून घ्या नंतर आपण प्रेत्येक बटाट्याला थोडेसे कापून त्यांचे मोठे मोठे तुकडेच आपण एक प्लेट मध्ये घ्या व ती प्लेट आपण मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. साधारण पणे आपण ते ३ मिनिटांपर्यंत ठेवून बाहेर काढावेत तुमचे बटाटे शिजलेले असतील. शिजलेले बटाटे आपण त्यांची साल काढून ते आपण आपल्या ज्या काही रेसिपीए मध्ये वापरणार आहेत त्यामध्ये आपण वापरावी.
तर मित्रांनो ह्या होत्या बटाटे फास्ट व योग्य पद्दतीने शिजवण्याच्या पद्धती, तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर ती लाइक व शेयर नक्की करा, धन्यवाद.