मित्रांनो वापरलेली चहा पावडर म्हणजेच आपण चहा बनवल्यानंतर तो गाळल्यावर जी चहा पावडर शिल्लक राहते ती पावडर आहे. ती चहा पावडर आपण स्वच्छ पाण्याने दोन -तीन वेळा धुवुन घ्यायची आहे. ती चहा पावडर उन्हात वाळवून घ्यायची आहे आणि मग त्या चहा पावडरचा वापर करायचा आहे.आता आपण त्या वापरलेल्या चहा पावडर चे उपयोग काय काय आहे ते खालील प्रमाणे बघुयात.
पहिला उपयोग म्हणजे आपल्या घरातील तेलकट कढई आणि तवा असतो,त्या तव्यात आणि कढईत काही भाजी किंवा काही फ्राय केलं कि त्यामध्ये तेलकटपणा हा तसाच राहतो त्या वेळेस तो ताव किंवा कढई गरम असतानाच त्यामध्ये आपण वाळवलेली चहा पावडर टाकून ती चहा पावडर स्वच्छ सगळ्या बाजूनी फिरून घ्यावी तर अश्या प्रकारे त्या चहा पावडर मुले त्या कढई आणि तव्याचा तेलकटपणा कमी होतो आणि कढई आणि तवा देखील स्वच्छ होतो.
वापरलेल्या चहा पावडर चा दुसरा उपयोग हा आपली जी काचेची क्रॉकरी किंवा आपले कप असतात त्या कपात खालच्या बाजूला काही डाग पडतात ते स्वच्छ करण्यासाठी या चहा पावडरचा वापर आपण करू शकतो.त्यासाठी चहा पावडर घेऊन त्यात थोडे पाणी घालून ती चहा पावडर त्या क्रोकरीला किंवा आपल्या कप ला देखील व्यवस्थित लावून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची असे करून बघा तुमची क्रोकरी आणि कप स्वच्छ होतील आणि त्यावरती एक वेगळीच चमक देखील येईल.
तिसरा उपयोग म्हणजे वापरलेली चहा पावडर हि घ्यायची आहे आणि एक ग्लास गरम पाण्यामध्ये दोन चमचे चहा पावडर आणि लिंबाच्या साली टाकून उकळून घ्यायचं आहे आणि त्या पाणी आपल्या केसांना छान लावून घायचे आहे आणि थोड्या वेळाने केस धुवून घ्यायचे आहेत असे केल्याने आपले केस मजबूत आणि चमकदार होतात.
वापरलेल्या चहा पावडरचा चौथा उपयोग असा आहे कि आपण चहा बनवल्यानंतर जी चहा पावडर असते ती स्वच्छ धुवून ती आपल्या गार्डन मधल्या फुलझाडांना घालायची आहे असं नकेल्यास झाडाची चांगली वाढ होते आणि झाडांना फुल देखील येण्यास मदत होते. तसेच झाडांना एक प्रकारे खत देखील मिळते.
आता आपण पाचवा उपयोग बघणार आहोत,तो म्हणजे आपल्या घरातील फ्रीजमध्ये एक असं वेगळा वास येत असतो किंवा आपण काही पदार्थ ठेवतो त्याचा वास हा फ्रीझमधला जात नाही तर तो वास घालवण्यासाठी आपण हि जी वापरलेली चहा पावडर आहे ती एका बाउल मध्ये काढून तो बाउल फ्रीजमध्ये ठेवायचा आहे असं केल्यास आपल्या फ्रीझ मधील वास निघून जातो.