धार्मिक

वटपौर्णिमा संपूर्ण माहिती ,तिथी आणि महत्व…

वटपौर्णिमा हा सण हिंदू धर्मात महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात.वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्यात येतो. वटपौर्णिमा हा सण महिला आपल्या नवऱ्याचे आयुष्य वाढावे आणि आरोग्य चांगले राहावे या साठी साजरा करतात.महिला ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात.

वडाच्या झाडाला खूप महत्व आहे.त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा महिला करतात.कारण वडाचे झाड हे दीर्घयुषी आहे. त्याप्रमाने आपला नवरा देखील दीर्घयुषी व्हावा यामुळे महिला वडाची पूजा करतात.

यावर्षी वटपौर्णिमा हि ३ जुन २०२३,ला शनिवारी आली आहे. वटपौर्णिमेच्या पूजाचा शुभ काळ हा सकाळी ११ वाजून १७ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ११ मिनिटांपर्यंत आहे.

वटपौर्णिमा पूजा साहित्य :-

विड्याची पाने ,सुपारी,गुळ-खोबरं ,आंबे,हळदी-कुंकू ,उदबत्ती ,कपूर,वाडाच्या झाडाला गुंडाळण्याची पांढरा दोरा ,पाणी भरलेला कलश,निरंजन,हिरव्या २ बांगड्या,गरसोळी ,फुले आणि एका टोपलीत धान्य गहू किंवा तांदूळ .

वटपौर्णिमा पूजा कशी करावी:-

सकाळी लवकर उठून आपली सकाळची सगळी कामे आवरून देवाची पूजा करावी.नंतर तुळशीची पूजा करावी आणि त्यानंतर वाडाची पूजा करण्यासाठी सगळ्या सुवासिनींनी एकत्र यायचं आणि वटपौर्णिमा व्रताचा संकल्प करावा. वादाच्या झाडाची मनोभावे पूजा करावी.वाडाच्या झाडाला हळदी कुंकू वाहून वडाच्या झाडाला धान्यांची ओटी भरा .

वडाच्या झाडाला उदबत्ती आणि निरंजन लावून ओवाळावे आणि नंतर वाडाच्या झाडाला हातात दोरा घेऊन सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत. वडाच्या झाडाला पंचामृत हे नैवेद्य दाखवायचा आहे.तुमची मनोभावे पूजा झाल्यानंतर “माझ्या पतीला दिर्घयुष्य आणि चांगले आरोग्य लाभू दे” अशी प्रार्थना करायची आहे.त्यानंतर पाच सुवासिनींना फळाने ओटी भरायची आहे. या दिवशीही रात्री महिलांनी कथा ऐकावी.

वटपौर्णिमेची माहिती आणि कथा :-

अनेक वर्षांपूर्वी अश्वपती नावाचा राजा होता.त्याला सावित्री नावाची मुलगी होती.ती खूप सुंदर आणि गुणी मुलगी होती. सावित्री उ[पवार झाल्यावर तिलाच तिचा पती निवडण्याची परवानगी तिला दिली होती.

सावित्रीला नारद मुनिनी सांगितलं होत कि तू सत्यवानाशी लग्न करू नकोस त्याच आयुष्य फक्त एक वर्षाचं आहे. तरी पण सावित्रीने सत्यवानाशी लग्न केलं.सत्यवानाचा मृत्यू फक्त तीन दिवसावर आला होता तेव्हा सावित्रीने उपास केला आणि व्रत सुरु केले होते.सत्यवान त्या दिवशी लाकुड तोडायला गेला होता आणि सावित्री पण त्याच्या सोबत गेली होती.

थोड्यावेळाने सत्यवानाला चक्कर आली आणि तो खाली पडला आणि यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन चालला होता. त्यावेळेस सावित्रीदेखील यमराजाच्या मागे जाऊ लागली. यमराज तिला म्हणाला कि आमच्या मागे येऊ नकोस पण सावित्री त्यांचं ऐकत नव्हती.काही वेळाने यमराजाने सावित्रीला तीन वर मागण्यास सांगितले.

सावित्रीने पहिला वर हा आपल्या सासू सासऱ्यांचे डोळे मागितले ,दुसरा वर आले राज्य मागितले आणि तिसरा वर मला एक मुलगा हवा आहे असा मागितला. यमराज सावित्रीला तथास्तु असा म्हणाला आणि तो वचनबद्ध झाल्यामुळे त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मागितले ते झाड वाडाचे होते.त्यामुळे जेष्ठ महिन्यात महिला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि व्रत करतात.