आरोग्य

सीताफळाविषयी अत्यंत महत्वाची माहिती, खाण्यापूर्वी नक्की वाचा.

मित्रानो सीताफळाचा सध्या सीजन चालु आहे ,त्यामुळे बाजारात भरपूर प्रमाणात सीताफळ बघायला मिळत आहेत. त्या रसरशीत दिसणाऱ्या सीताफळाना बघुन ते खाण्याचा मोह तर आपण थांबवु शकत नाही. सीताफळाचे आयुर्वेदातील भरपूर प्रमाणात फायदे आपण वाचलेले आणि ऐकलेले आहेत . सीताफळाचे आपल्या शरीराला फायदे हे भरपूर प्रमाणात होतात.

मित्रानो सीताफळाचे फायदे जेवढें आहेत ठेवढेच त्या सीताफळाचे नुकसान सुद्धा होत असते. त्यामुळे सीताफळ खाताना काळजी घ्यावी. आधीच्या काळात माणसं एक नाही तर पाच-सहा सीताफळ एकाच वेळेस खात होते, पण आता असं होत नाही एक च्या वर सीताफळ खाल्लं कि सर्दी होते, कारण सीताफळ हे थंड असतं. त्यामुळे सर्दी होते तर काहींना एवढी ऍलर्जी होत असते कि, सीताफळ खाल्यानंतर नुसत्या शिंका चालू होतात.

मित्रानो आता सध्या सीताफळाचा सीजन आहे, परंतु आता असं ऐकायला मिळत आहे कि, लहान मुलांनी जर जास्त प्रमाणात सीताफळ खाल्लं तर त्यांच्या मेंदुच्या उतींना डॅमेज होत आहे , त्यामुळे सीताफळ खाताना काळजी घ्या. तसेच म्हणतात ना कि, ” आती तेथे माती ” म्हणूनच मित्रानो काही खाण्याचं हे प्रमाण असत,अति प्रमाणात काहीही खाल्यास त्याचा त्रास हा होत असतो. त्यामुळे काहीही खाताना ते नेहमी प्रमाणातच खायचं असत.

मित्रानो तुमच्या मुलांना सीताफळ देताना काळजी घ्या , सीताफळ खूप चांगलं असत , त्याचे गुणधर्म चांगले असतात आणि सीताफळ मुलांनी खाल्लेले खूप चांगले असतात असं म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना सीताफळ हे रोज देऊ नका, तसेच हे लहान बरोबरच मोठ्या माणसांसाठी देखील रोज सीताफळ खाल्लेलं चांगलं नसत.

सीताफळामध्ये बायोऍक्टिव्ह कंपाउंड्स सुद्धा असते आणि त्यामुळे त्यांना ” अटीपिकल पार्किंग्सम डीसीस” हा आजार होत आहे.हा डीसीस म्हणजे ह्या डीसीसीमध्ये आपली स्मरणशक्ती कमी होत असते, आपण हळू हळू सगळं वीसरायला लागतो. या डीसीस मध्ये आपल्या मेंदूत प्रोटीन हे जास्त प्रमाणात साठत आणि आपल्या मेंदूच्या पेशींन ह्या ड्यामेज होतात. त्यामुळे काहीही खाताना त्या प्रमाणातच खायला पाहिजेत.

मित्रानो सीताफळाच्या पानांचा वापर हा काही लोक शुगर कमी करण्यासाठी करतात. सीताफळाच्या पानाचा राज हा शुगर कमी करतो असं मानतात. पण हे पान हे विषारी असतात , ह्या पानाचा रस जर आपण पिला तर आपल्याला जुलाब लागतात आणि जुलाब लागले तर आपली शुगर हि कमी तर होणारच ना. पण या पानांच्या रसामुळे आपल्या पोटातील वाईट बॅक्टरीया तसेच चांगले बॅक्टरीया पण मारून जातात तर आपल्या पोटाचं किती नुकसान होत असेल.

मित्रानो सीताफळ जर तुम्हाला खायचे असेल तर तुम्ही ते सकाळी किंवा संध्याकाळी खाऊ नका , तर ते तुम्ही दुपारी खाऊ शकता . दुपारी तुम्ही सीताफळ खाऊ शकता पण ते हि प्रमाणात खावा, एक-दोन खावा चालेल. परंतु सकाळी आणि संद्याकाळी आणि सर्दी असेल तर तुम्ही सीताफळ हे खाण टाळा. तसेच ज्यांना वात आहे त्यांनी सीताफळ हे प्रमाणात खावा आणि सीताफळ खाल्यावर पाणी देखील पिऊ नका. तर मित्रानो तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कंमेन्ट करून सागा.