विवोची नवीन Y श्रेणी मालिका या मध्ये विवो ने नवीन मोबाईल भरतात आणण्याचे ठरवले आहे. त्याचे नाव आहे Vivo Y72 5G. हा मोबाईल लोवकर भारतात येणार आहे. काही जणांच्या माहिती नुसार हा जुलै महिन्यात ग्राहकांसाठी हा मोबाईल उपलब्ध होणार आहे. तसेच Y मालिकेतील सर्व मोबाईल ग्राहकांच्या पसंतीस उतरले होते. हा नवीन Vivo Y72 5G मोबाईल सुद्धा ग्राहकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.
मिळालेल्या काही माहिती नुसार विवो Y७२ हा मोबाईल भारतात 5G तंत्रज्ञान सह दखल होणार आहे. या सोबत या मोबाईल मध्ये एकूण 12 जीबी रॅम असणार आहे. त्या मध्ये अजून 4 जीबी वाढविण्यात येईल. या व्यतिरिक्त हा फोन रीफ्रेश रेटसह फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. Vivo Y72 ला 5000mAh बॅटरी असणार आहे. या मोबाईल ची किंमत २० ते २५ हजार रुपया मध्ये असणार आहे.
या मध्ये प्रोसेसर (CPU speed) 2.2GHz असणार आहे. त्या सोबत उजव्या बाजूला मजबूत फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. ते साइड पॉवर बटणावर असेल. त्या सोबत आवाज कमी जास्त करण्यासाठी दोन बटण असणार आहेत. या व्यतिरिक्त 3.5 mm jack असणार आहे. फोन चार्जर कारण्यासाठी C टाइप पिन असेल त्यामुळे फोन खुप लवकर चार्ज होईल.
हा मोबाईल आधीच इतर देशात सुद्धा आधीच दखल झाला आहे. या मोबाईल मध्ये यात तीन कॅमेरे आहेत. त्यात प्राथमिक लेन्स 64 मेगापिक्सेल आहे. तर दुसरे लेन्स 8 मेगापिक्सेल आणि तिसरे लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचे आहेत. आणि सेल्फी साठी 8 मेगापिक्सेल आहे.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.