लाईफस्टाईल

सुती कॉटनची कपडे अश्या पद्दतीने धुवा, त्यांची चमक अगदी वर्षानुवर्षे टिकून राहील.

नमस्कार मित्रांनो आजच्या खास लेखात तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आपण वेगळ्या वेगळ्या रंगांची कपडे खरेदी करत असतो तसेच आपण कपडे कॉटन चे सुती, नायलॉन, टेरिकोट अश्या अनेक प्रकारचे कपडे खरेदी करतो, हे सगळे खरं हो मित्रांनो मात्र आपण हे धुताना मात्र आपण त्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे तर ते कपडे हे जास्त काळ टिकतात. तुमचा कॉटन शर्ट किंवा कुर्ती ह्या दोन्ही अगदी नव्यासारखे दिसावी असे वाटत असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

उन्हाळा आणि पावसाळ्यात जवळ जवळ सर्वच लोक कॉटनचे कपडे घालणे प्रेफर करतात. कारण ते खूप आरामदायक आहेत आणि त्यांच्यामध्ये कमी उकडते जेणेकरून कमी घाम येतो. पण केवळ चांगले सुती कापड खरेदी करणे पुरेसे नाही ना. तुमची कॉटनची कपडे जास्त काळ टिकून राहावीत आणि ती नव्यासारखी दिसावी असे वाटत असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना नीट धुण्यापासून त्यांच्या मेंटेनन्सपर्यंत अनेक गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते आणि हे सर्व करण्यासाठी काही वेगळे करण्याची गरज नाही, फक्त काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे कपडे निटनिटके राहतील.

ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा सुती कपडे धुण्यासाठी घ्याल त्यावेळी त्यावरील लेबल नक्की वाचा. त्या लेबल वरती त्याला धुण्याची योग्य पद्धत सांगतलेली असते जसे कि उदाहरणार्थ, जर कपडे फक्त ड्राय क्लीन करायचे असतील तर त्यावर “केवळ ड्राय क्लीन” असे लिहिलेले असते. वर एक तुम्हाला फोटो मध्ये दिसत असेल कि लेबलमध्ये दिलेल्या सूचनांवरून तुम्ही समजून जाल. पहिल्या चिन्हात एक बादली दाखवलेली आहे ज्यावर 30 लिहिलेले आहे ह्याचा अर्थ असा की आपण ती फक्त 30 अंश किंवा त्यापेक्षा कमी तापमानाच्या पाण्याने धुवू शकता. त्याहून जास्त खूप गरम पाण्याने धुवू नका.

आता पुढील चिन्ह आहे ते म्हणजे एक त्रिकोण, ज्यावर एक क्रॉस फुली आहे. ह्याचा अर्थ तुम्ही ह्या कपड्यावर ब्लीच वापरू शकत नाही. त्यानंतर आहे एक वर्तुळ आणि त्यावर क्रॉस चिन्ह देखील आहे. याचा अर्थ ते असा कि ह्याला वॉशिंग मशीन मध्ये धुतल्यावर तुम्ही ड्रायर मध्ये टाकून त्याला कोरडे करू नये. मग त्यानंतर आहे एक इस्त्रीचे चिन्ह म्हणजेच प्रेसचे चिन्ह बनवले आहे आणि त्याच्या मध्यभागी एक बिंदू असतो. याचा अर्थ तुम्हाला ते कमी आचेवर प्रेस करायचे आहे, आता शेवटचे चिन्ह आहे ते म्हणजे वर्तुळ आणि त्यावर P लिहिलेले आहे. ह्याचा अर्थ तुम्ही ते ड्राय क्लीन करू शकता परंतु ट्रायक्लोरोइथिलीन व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीने ते ड्रायक्लीन करा.

सुती कपड्यांची सर्वात मोठी ओरड एकच आहे ती म्हणजे ती धुतल्यानंतर ते थोडे आखूड होतात. जर तुमचा कुर्ता जर प्युर कॉटन चा बनवला असेल तर तो पहिल्या वॉशमध्ये तो नक्कीच आखडण्याची शक्यता असते त्यामुळे तो विकत घेताना त्याची साईझ हि आपण आपल्याला बसते त्याहून थोडी मोठी घेतली तरी चालते. शक्यतो आपण कपडे गरम पाण्यात धुणे टाळावे कारण त्यामुळे फॅब्रिक लहान होऊ शकते. सुती कपडे आपण कधीही गरम पाण्यात धुवू नका. त्यामुळे कपड्याचा रंग कमी होतो आणि फॅब्रिकचा धागा कमकुवत होतो, ज्यामुळे फॅब्रिक लवकर फाटण्याची शक्यता असते.

कॉटनची कपडे धुतल्यानंतर त्यांना हलक्या हातांनी पिळून घ्या व नंतर त्यांना हलक्या सूर्यप्रकाशात वाळवा. कडक सूर्यप्रकाशात त्यांना वाळवणे टाळा. हलक्या सूर्यप्रकाशात कपडे वाळवल्याने त्यांचा रंग देखील जात नाही. कपडे धुण्यासाठी नेहमी आपण सौम्य डिटर्जंट निवडा. जास्त हार्ड डिटर्जंट कपड्यांना नुकसान पोहचवू शकतात आणि तुमचे कपडे पिवळे दिसू शकतात. याशिवाय अनेक आफ्टर वॉश फॅब्रिक कंडिशनरही आजकाल आलेले आहेत तुम्ही त्यांचाही वापर करू शकता. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की, कपडे धुतल्यानंतर ते या कंडिशनरमध्ये काही वेळ भिजू द्यावेत आणि नंतर ते कोरडे करावेत.

तर मित्रांनो ह्या होत्या काही कपडे धुण्याच्या काही टिप्स मला अशा आहे कि तुम्हाला आजचा लेख आवडला असेल, हि माहिती आवडली असेल तर शेयर नक्की करा.