आरोग्य

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्याचे उपाय …

मित्रांनो आता उन्हाळा सुरु झाला आहे.उन्हाळा या ऋतूची सगळे वाट बघत असतात.कारण उन्हाळा म्हणलं कि,सगळ्याच्या आवडीचा आंबा, उन्हाळ्याची सुट्टी,आईस्क्रीम ,थंडगार सरबत ,पन्ह हि सगळी मजा तर उन्हाळ्यातच असते,म्हणून सगळ्यांना उन्हाळा आवडतो. परंतु उन्हाळा आला कि उन्हाळ्यात होणारे त्रास,ऊन ,घामोळं,उन्हाळी ,अंगाची जळजळ अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

मित्रानो या उन्हाळ्यात तुम्हाला उन्हाळ्यातील सगळ्या त्रासांना सामोरे जायचं असेल तर मी तुम्हाला घरगुती असे काही उपाय सांगणार आहे. उन्हाळ्यात सगळ्यांनाच या उष्णतेचा त्रास होत असतो,त्यामुळे हि उन्हाळ्यातील शरीराची उष्णता कमी करण्याचे उपाय मी तुम्हाला खालीलप्रमाणे सांगणार आहे.तर मित्रांनो हे उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला याचा फायदा होईल.

१)भरपूर पाणी पिणे:-

उन्हाळ्यात आपल्या शरीराची उष्णता हि अधिक असते.त्यामुळे आपल्या शरीरातीळ उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यात पाणी भरपूर पिणे गरजेचे आहे. आपण पाणी भरपूर पिल्यामुळे आपले शरीर थंड होण्यास मदत होते तसेच उन्हाळ्यात आपण फ्रीझ मधाळ पाणी पिऊ नये. त्यापेक्षा माठातलं पाणी पिणे खूप चांगले असते. त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता हि कमी होण्यास मदत होते.

२)सब्जा बी टाकून पाणी पिणे :-

मित्रानो सब्जा बी जर आपण जूस ,लिंबू सरबत किंवा आपलं साधं पाणी यात सब्जा बी टाकून जर हे पाणी पिलं तर आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.कारण सब्जा बी हे आपल्यास शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करते. सब्जा बी हे खूप थंड असते.त्यामुळे उन्हाळ्यात सब्जा बी घातलेले पाणी पिल्यास खूप फायदा होतो.

३)खडीसाखर आणि जिरे खाणे:-

खडीसाखर आणि जिरे हे खूप थंड असल्यामुळे आपल्या शरीरातीळ उष्णता खूप लवकर कमी होण्यास मदत होते.एक चमचा साखर आणि एक चमचा जिरे घेऊन ते चावून खाऊन त्यावर पाणी पिल्यास आपल्याला लागलेली उन्हाळी देखील लवकर कमी होते .तसेच आपल्याला लघवीला जर जळजळ होत असेल ते देखील या जिरे आणि खडीसाखर नि कमी होण्यास मदत मिळते.

४)कडुलिंबाचा रस :-

मित्रानो कडुलिंबाच्या काडीने तुम्हीं सकाळी दात घास आणि त्यामुळे दात स्वच्छ होतील आणि तुम्हाला त्या कडुलिंबाच्या रसांनी उष्णता देखील कमी होईल.कडुलिंबाच्या रसामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल.

५)कोकम सरबत :-

मित्रानो कोकम सरबत हे आपल्या शरीरातील उष्णता कमी करत आणि उन्हामुळे जर आपल्याला ऍसिडिटी झाली असेल ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळा सुरु झाला कि कोकम सरबत हे घेतलेच पाहिजे.त्यामुळे या उन्हाळ्यात कोकम सरबत प्या यामुळे तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

६)गाठींच पाणी घेणे:-

मित्रानो आपण गुढीपाडव्याला ज्या साखरेच्या गाठी आणतो त्याचा वापर आपण शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी करू शकतो.साखरेच्या गाठीचे दोन तुकडे घेऊन ते एक ग्लास पाण्यात टाकू त्या गाठी विरघल्या कि ते पाणी पिऊन आंपण आपल्या शरीरातील उष्णता कमी करू शकतो.या गाठीचं पाणी तुम्ही जर पिळत तर तुमच्या शरीरातीलउष्णता कमी होईल आणि उन्हाळी देखील लवकर कमी होण्यास मदत होईल.