ब्रेन हॅमरेज म्हणजे काय? लक्षणे , उपचार आणि कारणे
आरोग्य

ब्रेन हॅमरेज म्हणजे काय? लक्षणे , उपचार आणि कारणे…

मित्रानो पहिल्यांदा आपण ब्रेन हॅमरेज म्हणजे काय ? हे आपण जाणुन घेऊयात.
ब्रेन हॅमरेज म्हणजे काय ?

आपल्या मेंदूतील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो यालाच ब्रेन हॅमरेज असे म्हणतात. ब्रेन हेमराज लाच ब्रेन बिल्ड असे देखील म्हणतात. ब्रेन हॅमरेज झालं तर आपल्या मेंदूत दाब वाढतो . तसेच ऑक्सीजनची पातळी हि कमी कमी होते . त्यामुळे मेंदूच्या पेशी या नष्ट होऊ शकतात. त्यामुळे लगेच डॉक्टरकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे असते.

ब्रेन हॅमरेज चे चार प्रकार आहेत. ते कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात.

१)सबड्युरल हॅमरेज
२)एपिड्युरल हॅमरेज
३)सबरॉक्नॉइड हॅमरेज
४)इन्ट्रासेरेबल हॅमरेज

ब्रेन हॅमरेज ची लक्षणे :-

ब्रेन हॅमरेज झाल्यावर मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यावर डोकेदुखी होत नाही आणि आपल्या मेंदूच्या पेशींना सुद्धा कळत नाही कि मेंदूत रक्तस्त्राव झाला आहे. परंतु जर मेंदूतील रक्तस्त्राव हा जर मेंदूच्या आवरणात झाला तर मात्र असहाय्य अशी डोकेदुखी होते. तेव्हा मात्र डोकेदुखी हे मुख्य लक्षण आहे.

ब्रेन हॅमरेज ची अजून काही लक्षणे आहेत, ते खालीलप्रमाणे आहेत.

1)बोलताना अडथळा येणे.
2)अशक्तपणा येणे.
3)डोक्याचा एका बाजूला बधिर वाटणे.
4)शुद्ध हरपल्यासारखे वाटणे.
5)तोल जाणे.
6)डोळ्यानि बघताना त्रास होणे.
7)झटके येणे.

ब्रेन हॅमरेज ची मुख्य कारणे :-

ब्रेन हॅमरेज ची मुख्य करणे कोणकोणती आहेत कि ज्यामुळे ब्रेन हॅमरेज होतो ती कारणे आपण जाणून घेऊयात.

मेंदूला काही दुखापत किंवा जखम होणे.
उच्च रक्तदाब असणे.
ब्रेन ट्युमर असणे.
प्लेटलेट्ची कमी असणे.
यकृताचे विकार असणे.

मित्रानो ब्रेन हॅमरेज चे मुख्य कारण हे उच्च रक्तदाब आहे. उच्च रक्तदाब असल्यामुळे सेरेबल वाहिन्यांचे नुकसान होते. त्यामुळे मेंदूत रक्त जमा होऊन स्ट्रोक येतो. जवळपास १३ % स्ट्रोकस हे उच्च रक्तदाबामुळेच होतात. मेंदूला जास्त इजा झाल्यामुळे आणि रक्त वाहिलेले टिशू चिटकल्यामुळे सूज येते. तसेच साठलेले रक्तामुळे हेमाटोमा होतो. मेंदूच्या टिशूवर खूप दबाव वाढतो आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा जास्त होतो. त्यामुळे मेंदूच्या पेशींचा नाश होतो.

ब्रेन हॅमरेजवर उपचार कसा करावा.हे आपण जाणून घेऊयात .सगळ्यात पाहिलं पेशंटने डॉक्टरकडे जाऊन एमआरआय किंवा सिटीस्कॅन करायला सांगतात, त्यामुळे कळत कि ब्रेन हॅमरेज नेमकं कुठे झाला ते समजते. त्यानंतर पुढे कोणत्या टेस्ट करायला पाहिजेत ते सांगितलं जात.

सगळ्यात पाहिलं आपण डॉक्टरकडे जाऊन एमआरआय किंवा सिटीस्कॅन करायला सांगतात, त्यामुळे कळत कि ब्रेन हॅमरेज नेमकं कुठे झाला ते समजते. त्यानंतर पुढे कोणत्या टेस्ट करायला पाहिजेत ते सांगितलं जात.तसेच ओजिओग्राफी केली जाते आणि मेंदूच्या आर्टरी मध्ये डाय घालून बघितलं जात कि मेंदूत गळती नेमकं कुठे झाली ते बघितलं जात. तसेच कॉम्पुटेड टोलोग्राफी अँजिओग्राफी केली जाते.सेरेबोस्पायनर द्रव चाचणी देखील केली जाते. लंबर पंक्चर केलं जात.

मित्रानो पेशंटचे पहिले काही दिवस त्याची काळजी घेणे गरजेचे असते. पेशंटचा ऑक्सिजन आणि रक्तदाब हा नियंत्रणात ठेवणे हे खूप महत्वाचे असते.त्यानंतरच शास्त्रकिया करायला सुरुवात केली जाते. सध्या ब्रेन पाथ हि एक नवीन शास्त्रकिया आहे या शास्त्रकियेमुळे पेशंटला कमी वेदना होतात आणि लवकर बरं वाटतं .