आरोग्य

PCOD म्हणजे काय? जाणून घ्या PCOD ची लक्षणे कोणती …

PCOD म्हणजे काय ?

PCOD हा आजार स्त्रियांना हार्मोनच्या असंतुलनामुळे होत असतो.ह्या आजारात स्त्रियांना गर्भाशयात लहान लहान असे ट्युमर किंवा सिस्ट तयार होत असतात. याचा परिणाम हा त्यांच्या मासिक पाळीवर आणि गर्भधारणेवर होत असतो. PCOD ह्या विषयी आपण संपूर्ण माहिती हि सविस्तार आपण बघुयात.

स्त्रियांच्या अंडाशयात एक सामान्य प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात अंडाशयात हार्मोन्सचे प्रमाण हे अधिक होते. तसेच अंडाशयात वाढणारा एक द्रवपदार्थ साठला जातो आणि त्याचा आकार वाढतो आणि मग त्याचे गंभीर रूपात रूपांतर होते यालाच PCOD असे म्हणतात. यामुळेच स्त्रियांना गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात, स्त्रियांची प्रजनन क्षमता हि कमी होते आणि त्या स्त्रीला आई होण्यास खूप अडचणी निर्माण होतात.

महिलांमधील PCOD ची लक्षणे :-

लैगिक इच्छा कमी होणे.

अनियमित मासिक पाळी.

केस गळणे.

चेहरा आणि शरीऱ्यावर अनावश्यक केस येणे.

केसात कोंडा होणे.

पोट दुखणे.

सतत गर्भपात होणे.

सोनोग्राफीमध्ये गर्भाशयात लहान गोळे दिसणे.

गर्भधारणेत अडचणी येणे.

लठ्ठपणा .

PCOD कमी करण्यासाठीचे घरगुती उपाय:-

PCOD हे कमी करण्यासाठी स्त्रियांच्या त्यांच्या उंचीप्रमाणे त्याचे वजन असणे गरजेचे असते. त्यांची उंची किती आहे त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे वजन हे नियंत्रणात ठेवले पाहिजे . तसेच स्त्रियांनी नियमित व्यायाम हा केला पाहिजे. PCOD असणारांच्या वजनावर म्हणजेच वजन जस वाढतो तसा हा प्रॉब्लेम हा वाढतो. त्यामुळे व्यायाम करून वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे.

१)वजन नियंत्रित ठेवणे:-
PCOD असणाऱ्यांनी त्यांचे वजन हे कमी करणे खूप गरजेचे असते.वजन हे कमी केल्यामुळे मासिक पाळी हि नियमित येण्यास मदत होते. तसेच PCOD असणाऱ्यांनी नियमित व्यायाम देखील करावा म्हणजे त्यांना वजन कमी करण्यास मदत होते.

२)आहार योग्य घ्यावा :-
PCOD असणाऱ्यांनी अधिक प्रमाणात फायबर,प्रथिने ,चरबीयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया न केलेले पदार्थ आहारात घ्यावेत म्हणजे त्यांचे वजन नियंत्रणात राहण्यास देखील मदत होते.तसेच ब्राऊन राईस ,किनोवा आणि ब्राउन ब्रेड याचा वापर करावा.तसेच चिकन,मासे बीन्स आणि टोफू ह्याचे सेवन करावे.

३)ड्राय-फ्रुटसचे अधिक सेवन:-
ड्राय फ्रुटस मध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ड्राय फ्रुटस हे नियमित खाल्ले पाहिजेत.त्यामध्ये आक्रोड ,बदाम आणि चिया सीड्स हे देखील चांगले असते. तसेच ड्राय फ्रुटस हे इन्सुलिनची पातळी कमी करू शकतात.

४)फायबर युक्त फळे :-
PCOD असणाऱ्यांनी संत्री,द्राक्षे.लिबू असे सी व्हिट्यामिन असलेली फळे हि अधिक खावीत.तसेच सफरचंद ,किवी,नाशपती असे फायबर युक्त फळे हि नियमित खावीत. तसेच स्ट्रॉबेरी ,रासबेरी,ब्लूबेरी हि देखील फळे हि नियमित खावीत यात इन्सुलिन कमी करण्यास मदत होते.

५)पुरेशी झोप :-                                                                                                   PCOD असणाऱ्या महिलांनी झोप हि पुरेश्या प्रमाणात घेतली पाहिजे.झोप हि जर चांगली आणि पुरेशा प्रमाणात घेतली तर मूड पण फ्रेश राहतो आणि उत्साह निर्माण होतो.