सुंदर असा कोणता दागिना आहे, जो स्त्रीला नवऱ्याकडून हवा असतो. ,a woman want from her husband?
लाईफस्टाईल

सुंदर असा कोणता दागिना आहे, जो स्त्रीला नवऱ्याकडून हवा असतो.

स्नेहल सकाळी नेहमी पेक्षा लवकर उठली होती. आणि तिचा पती राहुल हा कधी नाही ते लवकर उठून कोठेतरी बाहेर गेला होता. तो सुद्धा स्नेहलला न सांगता. त्यामुळे स्नेहल थोडी चिंतींत होती. स्नेहाल सकाळी उठल्यावर घरातील कोणतेही काम नकरता आधी अंघोळ करून देवांची पूजा करते आणि मागेच चहा घेत असे. पण चहा झाला तरी अजून राहुल आलेला नव्हता. त्याचा ती विचार करत चहा घेत होती.

तितक्यात तिच्या कानावर आवाज येतात. स्नेहल कुठे आहेस मला चहा हवा आहे. अजून का चहा केला नाहीस असा आवाज राहुल ओरडत येत होता. तितक्यात स्नेहल राहुला म्हणाली मला न सांगता कुठे गेला होतास आणि किती वेळ लागेल हेही मला माहित नव्हते त्यामुळे माझ्या पुरता चहा केला आणि पिला. हो पण मला चहा उठल्यावर लागतो हे तुला माहित आहेना असे राहुल स्नेहला म्हणाला. स्नेहल राहुला म्हणाली थांब मी लगेच चहा करून देते.

स्नेहलने राहुल विचारले असे कोणते काम होते जे कि इतक्या सकाळी तुला बाहेर जावे लागले. ते सुद्धा मला न सांगता, तुला जवावे लागले. राहुल चेहऱ्यावर थोडेसे स्मित देत स्नेहच्या जवळ जाऊन म्हणाला आजचा दिवस खुप खास आहे. त्यामुळे बाहेर गेलो होते. राहुल आपल्या खिस्यात हात घालून त्यांनी आणलेला गजरा तिच्या केसात लावत होता . मोगऱ्याच्या सुगंध सर्वत्र पसरला होता. त्यामुळे आजूबाजूचे वातावरण सुद्धा खुल्ले होते.

राहुल स्नेहला सुंदर मोगऱ्याच्या फुलांचा गजरा देत म्हणाला. या मोगऱ्याच्या सुगंधा प्रमाणे माझ्या आयुष्य सुद्धा तू सुंदर बनवून टाकले आहे. तुझ्या सोबत कधी साठ वर्ष निघून गेले काहीच समजले नाही. माझ्या प्रत्येक आवडी निवडी तू जपल्यास. कधी प्रेमाने तर कधी कठोर होऊन माझ्या चुकीच्या सवई बदल्यास असे राहुल स्नेहला बोलतो. स्नेहलच्या चेहऱ्यावर थोडे स्मित येते.

राहुल स्नेहल कडे पहात बोलतो तुला मी पहाण्यासाठी आलो होतो तो दिवस आठवतो? तू केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा लावलेला होतास चाऱ्यावर कोणतेही मेकप केलेले नव्हते. तुझ्या या सध्या पणामुळे तू इतकी सुदंर दिसत होतीस. तशी आज सुद्धा सुंदर दिसत आहे. असे राहुल म्हणाला. हे वाक्य स्नेहलच्या कानावर पडताच ती लाजत लाजत राहुल ला मिठी मारते. आणि स्नेहल म्हणते काहीच कळाले नाही साठ वर्ष सहजीवनाचे कसे गेले ते.

खरे तर मी बिलकुल तयार नव्हते लग्न करायला. मी आई आणि बाबा सुद्धा संगतीला होते. पण माझे बाबा ऐकण्याच्या बिलकुल तयारीत नव्हते.असे स्नेहल राहुल सांगत होती. तु मला पाहण्यसाठी येत आहे असे मला काही तसा आधीच संगितले गेले. त्यामुळे मला काहीच तयारी कराल वेळ मिळाला नाही. तू माझ्या सोबत बोलण्याची इच्छा व्यक्त केली त्या वेळेस मी थोडी नर्व्हस झाली होती. कारण हा माझा पहिलाच प्रसंग होता असे स्नेहल राहुला म्हणाली.

तू ज्या वेळी मला तू म्हणालास तू मला माफ कर कारण मी तुझ्या बाबानी बोलावल्यावर लगेच आलो मी त्यांना नाही म्हणू शकतो नाही. कारण पहिलीच भेटीत नाही म्हणू शकलो नाही. तू तुच्या शिक्षणा बद्दल आणि नोकरी बद्दल सुद्धा सांगितलंस. मला कोणतेही व्यसन नाही आणि कोणत्याही मुलीकडे वाकड्या नसरेने कधीही पाहिले नाही. हे ऐकल्यावर मला थोडे हसू आले. पण तुच्या डोळ्यात खरे पणा दिसत होता आणि त्याच क्षणी तुझ्या बद्दल होकार माझ्या मनानी दिला होता.

आज आपल्या लग्नाला साठ वर्ष झली. या मोठया प्रवासामध्ये चढ उत्तर बरेच झाले पण एक मेकांबद्दल असलेले प्रम कधीच कमी झाले नाही. इतरां प्रमाणे आपल्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वादविवाद होत होते पण दोघांमध्ये सामंजस पणा आल्यामुळे कधी तू तर कधी मी माघार घेतहोतोत. यामुळेच साठ वर्ष आपला संसार सुखाचा झाला.

एखादे नाते टिकवण्यासाठी एकमेकांवर असलेला विश्वास, आपुलकी एकमेकांबद्दल आलेला आदर याच गोष्टी खुप महत्वाच्या असतात. राहुल स्नेहलचा हात हातात घेऊन तिला विचारतो तुला काय हवे आहे ते सांग, आज तू जे मागशील ते मी तुला देईन. तुच्या मुळे माझे आयुष्य बलून गेले आहे. तुच्या मनात जी काही इच्छा आहे ती सांग. मी तुला नक्की देणायचा पर्यंत करतो.

स्नेहल राहुल म्हणते तसे पहिल्या गेल्यास बायको म्हणून तिला सोने, घर, कर, पैसा या गोष्टी नको असतात. तीला हवे असते मानसन्मात, प्रत्येक सुखदुःखात तिच्या सोबत रहाणार, तिला आपले म्हणे कोणासोबत तरी विश्वासाने मांडता येणार माणूस. या सर्व गोष्टी बायको आपल्या नवऱ्यात पहात असते आणि या सर्व गोष्टी तू मला दिल्या आहेत.

हे पण वाचा :- नाते कसे टिकवावे ज्या ठिकाणी नवरा किंवा पत्नी या दोघांपैकी एक खुपच संशयी असेल तर.

तू मला दिलेला समंजपान आणि दिलेला वेळ हा माझा खरा दागिना आहे. ज्या वेळी तुला मला वेळ देत होतात त्या वेळेस तू फक्त माझाच विचार करत होतास हेच मझ्यासाठी सर्वात मोठा दागिना होता, संसार म्हणजे फक्त वस्तू गोळा करणे नसून एक मेकांना आदराने वागणूनक देणे सुद्धा आहे.