धार्मिक

राखीपौर्णिमा कधी आहे ? राखी बांधायची कधी ? ३० का ३१ ऑगस्ट ,जाणून घ्या शुभ मुहूर्त…

भारतात राखी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.राखी पौर्णिमेलाच “रक्षाबंधन ” आणि “नारळी पौर्णिमा ” असे म्हणले जाते.राखी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्यात येतो. तसेच श्रावण महिण्यातील पौर्णिमेला राखीपौर्णिमेला हा सण येतो आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या वर्षी अधिक महिना आल्यामुळे श्रावण महिना हा पुढे गेला त्यामुळे सगळे सण हे सुद्धा उशिरा आलेले आहेत.राखी पौर्णिमा हा सण भावा-बहिणींच्या प्रेमाचा दिवस मानला जातो. भावाला त्याचा बहिणीला भेटण्याची ओढ निर्माण करतो.

राखीपोर्णीमेला बहिण हि आपल्या भावाला आपल्या घरी बोलवते. या सणाला बहिण हि आपल्या लाडक्या भावाला राखी बांधत असते आणि भाऊ तिला छानसं गिफ्ट देत असतो आणि तिचे रक्षण करण्याचं वचन तिला देत असतो.अश्या प्रकारे राखीपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.

यावर्षी राखी[पौर्णिमेवर भद्राचं सावट आल्यामुळे राखी हि ३० ऑगस्ट ला बांधायची कि ३१ ऑगस्ट ला हा प्रश्न सगळ्यांनाच येत आहे. परंतु ७०० वर्षांनी हा असा योग्य आला आहे . तसेच पंचांगामध्ये ३० ऑगस्ट ला बुधवारी सकाळी १०.५८ ते ३१ ऑगस्ट ला सकाळी ७.०५ पर्यंत हा मुहूर्त असणार आहे.

तसेच ३० ऑगस्ट ला सकाळी १०.५८ पासून रात्री ९.०१ पर्यंत हे भद्राच सावट असणार आहे.तरी या काळात राखी बांधू नये असे सगळे म्हणत आहेत. परंतु पिंपळकर सांगतात,कि या काळात देखील राखी बांधली तरी चालते,कारण राखी पौर्णिमा हा धार्मिक विधी नाही.

आपण राखी पौर्णिमा हा सण ३० ऑगस्ट ला साजरा करू शकतो. तसेच जर तुम्हाला हा सण भद्राच्या सावट असल्यामुळे साजरा करावा वाट नसेल तर तुम्ही ३० ऑगस्ट ला रात्री ९.०१ या नंतर ३१ ऑगस्ट ला सकाळी ७.०५ पर्यंत हा सण साजरा करू शकता.तसेच तुम्हाला सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा! . धन्यवाद .