धार्मिक

देवघरातील शंख कुठे,कसा ठेवावा? ,याबद्दल अत्यंत महत्वपूर्ण माहिती…

प्रत्येकाच्या देवघरात शंख हा असतोच ,असायलाच पाहिजॆ. प्रत्येक शुभ कार्यासाठी शंखाचा वापर हा होतो.त्यामुळे शंख हा आपल्या देवघरात असला पाहिजे.आपल्या घरातील प्रत्येक पूजा आणि घरातील लग्न कार्य यासाठी शंख हा लागतोच.

मित्रांनो देवघरातील शंख हा कसा असावा याबदल माहिती सांगणार आहे.

शंख हा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ज्यांच्या घरात शंख असतो त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास आहे असं मानलं जात.शंख हे दोन प्रकारचे असतात शंख जो आपण देवघरात ठेवतो आणि जो शंख वाजवला जातो तो शंख थोडा मोठा असतो आणि तो देवघरात ठेवला जात नाही.

देवघरातील शंख हा नेहमी दक्षिणावर्ती असावा.दक्षिणावर्ती शंख कसा ओळखायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे.आपण पूर्वेकडे तोड करून उभे असल्यावर आणि शंखाचे मुख हे पूर्वेकडे आणि निमुळता भाग हा पश्चिमेकडे आहे आणि आपल्या उजव्या हाताला म्हणजेच दक्षिण दिशेला शंखचा उघडा भाग असेल तर हा दक्षिणावर्ती शंख मानला जातो

मित्रानो तसेच शंखाचा उघडा भाग जर उत्तरेकडे किंवा डाव्या बाजूला असेल तर त्याला वामवर्ती शंख मानला जातो.आणि मध्यमवर्ती शंख चा उघड भाग हा मध्यभागी असतो तो मध्यमवर्ती शंख असतो.अश्या प्रकारे शंख असतात. परंतु आपण देवघरात नेहमी दक्षिणावर्ती शंख ठेवावा.

मित्रांनो देवघरात छोटा शंख ठेवला जातो. शंख हा कधी खाली ठेऊ नये तो ठेवताना त्याच्या खाली कासवाच्या स्टॅन्ड असत किंवा शंखाच्या आकाराचं एक स्टॅन्ड असत त्याच्या वरती शंख ठेवावा.शंख ठेवताना त्यामध्ये थोडं पाणी भरून ठेवावं.

शंख हा ठेवताना नेहमी त्याचा निमुळता भाग हा कधी सुद्धा दक्षिणेकडे करू नये ,पूर्वेला किंवा पश्चिमेला करावा.शंख हा देवघरात आपल्या उजव्या हाताला ठेवावा.शंखाची रोज पूजा करावी.देवघरात शंख हा ठेवला तर सुख आणि समृद्धी वाढते.

मित्रानो हि देवघरातील शंखाबद्दल अत्यंत महत्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली.हे तुम्ही आम्हाला हि तुम्ही या माहितीला लाईक करा,आणि आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.