मधुमेह असलेल्या लोकांनी दूध घेतले पाहिजे कि नाही.
आरोग्य

मधुमेह असलेल्या लोकांनी दूध घेतले पाहिजे कि नाही.

दूध हे आपल्या जीवनातील एक महत्वाचा घटक आहे. जवळ पण प्रत्येकाच्या घरी दूध किंवा दुधाचे पदार्थ येत असतात. घरातील प्रत्येक व्यक्ती दूध किंवा दुधाचे पदार्थ खात असतो. दुधाचे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. त्यामुळे त्याचे योग्य प्रमाणत सेवन केल्यास त्याचा फायदा होतो. जर का अती सेवन दुधाचे केले तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला होताना दिसून येतात.

बऱ्याच लोकांचा समाज आहे. जर का रोज दूध पिले तर शरीरातील फॅट वाढण्यास मदत होते. तसेच मधुमेह असलेल्या लोकांनी जर का दुधाचे सेवन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. यामुळे सुद्धा बरेच लोक दूध पीत नाही. मग ज्या लोकांना मधुमेह आहे अशा लोकांनी दूध प्यावे का नाही . जर का दूध प्याचे असेल तर किती पमाणात दूध घेतले पाहिजे आणि कधी घेतले पाहिजे याबद्द आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

दूध हे आपल्या लहान पनापासून घेतला जाणारा पदार्थ आहे. लहान मुलाना काही महिने आईच दूध दिले जाते. हळू हळू त्या लहान मुलाला वरच दूध दिले जाते. कारण दुधात असे अनेक घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. तसेच इतर वेगवेगळे पदार्थ खाल्याने जे काही लाभ आपल्या शरीराला मिळणार असतात तेच लाभ आपल्याला दुधातून मळतात.

खरेतर आपल्या रोजच्या आहारात सुद्धा दूध असते. दुधात जवळपास ८५% पाणी, ५% कर्बोदके , ३% ते ७% कॅल्शियम आणि चरबी, १२B नावाचे जीवनसत्वे आहेत. तसेच चंगल्या प्रकारची प्रथिने, कोलेस्ट्रॉल आहे. हे सर्व घटक काही प्रमाणत कमी जास्त असू शतकात. जे लोक मासाहार करत नाही अशा लोकांसाठी दूध हे खुप उपयुक्त पदार्थ आहे. कारण यामध्ये जीवनसत्वे आणि प्रथिने आहेत. असे पहिला गेल्यास आपल्या शरीरासाठी दूध हे चांगले आहे.

मग मधुमेहाच्या लोकांनी दूध प्यावे कि नाही याबद्दल जाणून घेऊ. तसे पहिला गेल्यास दूध हे महत्वाचे आहे. तसेच दूध पिल्यानंतर शरीरातील साखर वाढण्याचे प्रमाण खुप कमी आहे. त्यामुळे इतर ज्युस किंवा पातळ पदार्थ घेण्याचा विचार करतो त्या पेक्षा दूध घेणे कधीही चांगले आहे. कारण इतर पदार्थ खाल्याने आपल्या शरीरातील साखर वाढत असेल तर त्या पेक्षा दूध घेणे कधी पण चांगले.

पण जर का पण दुधाचे अति सेवन केल्यास त्याचे तोटे सुद्धा आहे. तसेच दूध एवेकजी इतर कोणते दुधाचे पदार्थ आहेत ज्याचे आपण सेवन केले पाहिजे हे आपण थोडक्यात जाऊन घेऊ. दुधा मध्ये काही प्रमाणत साखर असते. जरी आपण दुधात साखर टाकून नाही पिले तरी त्यात लॅक्टोस नावाची साखर त्यात आहे. त्यामुळे दूध पिल्यानंतर काही प्रमाणत आपल्या रक्तातील साखर वाढल्यास मदत होते.

अशा वेळी आपण दुधा व्यतिरिक्त इतर पदार्थ आहारात घेऊ शकतो. जसे कि दही तुम्ही आहारात घेऊ शकतात. कारण दुधाचे रूपांतर दह्यात झाले तर त्यातील लॅक्टोस चे परूपांतर काही प्रमाणत लॉक्टिस ऍसिड मध्ये रूपांतर होते. आणि दुधाची कर्बोदके काही प्रमाण कमी होतात. त्यामुळे काही प्रमाणत दही किंवा ताक घेणे कधी पण चांगले.

त्याच सोबत दुधापासून तयार होणारे पनीर सुद्धा चांगले आहे. कारण दुधाचे रूपांतर जर का पनीर मध्ये रूपांतर झाले तर त्यामधील बऱ्याच प्रमाणात कर्बोदके कमी होतात तसेच ग्लाइसेमिक इंडेक्स कमी प्रमाण कमी होते. पण दुधातील प्रथिने आणि जीवनसत्वे आपल्या तेवढ्याच प्रमाणत मिळतात. त्यामुळे आपल्या आहारात पनीचे पदार्थ अवश्य ठेवावे.

त्याच सोबत चीज सुद्धा खुप चांगला पदार्थ आहे. चीजचा ग्लाइसेमिक इंडेक्स कमी प्रमाण कमी होते. त्याच सोबत त्यात प्रथिने आणि जीवनसत्वे सुद्धा बऱ्याच प्रमाण आहेत. फक्त यात मीठ आणि फॅट खुप मोठ्या प्रमाणत असतात. त्यामुळे इतर मिठाचे आणि फॅट चे पदार्थ कमी करून चीजचे सेवन अवश्य करावे. मधुमहे असलेल्या लोकांनी अवश्य दुधाचे सेवन केल्यास चालते. पण त्याचे अति सेवा योग्य नाही. दुधाचे अति सेवन केल्यामुळे दुः इतर त्रास होताना वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे दूध प्यावे पण त्याचे योग्य प्रमाणत प्यावे.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.