वास्तुशास्त्रा

वास्तुशास्त्रा नुसार कपाट कोणत्या दिशेला ठेवणे शुभ आणि कोणत्या दिशेला अशुभ हे जाणून घेऊ.

वास्तुशास्त्र हे एक खुप मोठे शास्त्र आहे. या मध्ये घरातील वस्तू कोणत्या दिशेला ठेवल्या पाहिजे, त्याचा कोणत्या कलर असला पाहिजे. तसेच त्याचा आकार कसा असला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. वास्तुशास्त्रा नुसार कपाट कोणत्या दिशेला ठेवणे शुभ आणि अशुभ हे आज आपण जाणूनघेणार आहोत. वास्तुशास्त्रा नुसार आपल्या घरातील तिजोरी योग्य दिशेला असेल तर त्या पैशात वाढ होत जाते.

पण काही वेळेस आपल्या हातून तिजोरी / कपाट हे चुकीच्या दिशेला ठेवल्यास आपल्या होऊन हळू हळू पैसा निघून जातो. आलेला पैसा कोणत्याही मार्गाने घराबाहेर निघून जातो. परिणामी आपण गरीब होत जातो. वास्तूशास्त्रा नुसार घरातील तिजोरी / कपाट कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्र नुसार तिजोरी / कपाट या दिशेला ठेवा.

वास्तुशास्त्र नुसार आपण तिजोरी / कपाट हे दक्षिण दिशेला ठेवले पाहिजे. ही जागा तिजोरी ठेवण्यासाठी सर्वात चंगली जागा मानली गेली आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न येत असेल दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. हो हे बरोबर आहे दक्षिण दिशा हि यमाची दिशा म्हणून ओळखली जाते. जर का आपण तिजोरी दक्षिण दिशेला ठेवली जरी असली तरी त्या तिजोरीचा दरवाजा हा उत्तर दिशेला उघडतो त्यामुळे दक्षिण दिशेला तिजोरी ठेवायची आहे.

उत्तर दिशा ही धनाचे देव श्री कुबेर यांची आहे. असे मान्यता येते कि ज्या कपाटाचे दरवाजे उत्तर दिशेला उघडते त्या तिजोरीत / कपाटात पैसा येत जातो किंबहुन पैश्यची वाढ होत जाते. तसेच कपाट दक्षिण भिंतीकडे ठेवताना दोन्ही मध्ये अंतर (किंचित ) हे नक्की ठेवा. तसेच वास्तुशास्त्रा नुसार आपल्या देव घरातील माता लक्ष्मीचे मुख हे दक्षिण दिशेला ठेवा.

त्याच प्रमाणे आपण तिजोरी कोणत्या रूम मध्ये ठेवणार आहोत किंवा ठेवली आहे हे सुद्धा खुप महत्वाचे आहे. ज्या रूम मध्ये तिजोरी ठेवणार आहोत त्यारूमला एकच दरवाजा असला पाहिजे. तसेच दोन भागात असलेला दरवाजा पाहजे. तसेच तो दरवाजा हा उत्तर किंवा पूर्व भिंतीना असणे खुप चांगले मानले गेले आहे. चुकून सुद्धा या दोन दिशेच्या भिंतीला या दरवाजा नसावा एक दक्षिण आणि नेऋत्य. तसेच दरवाजा उघडल्यानंतर आपल्या तिजोरी दिसेल असे ठेऊन नका.

त्या रूमच्या खिडक्या उत्तर आणि पूर्व दिशेला उघडणाऱ्या असल्या पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे. वास्तूशास्त्रा नुसार तिजोरीला स्वतःचे पाय असणे गरजेचे आहे. नाही तर पैशात वाढ होत नाही. किंवा तो तसाच रहातो. तिजोरी हि कोणताही वस्तूवर ठेऊन नये. ती जमिनीवर ठेवावी. तसेच जर का जमिनीवर तिजोरी ठेवल्यास ती हलत असेल तर त्याला आधार म्हणून लाकडाचा आधार घ्यावा. पण कोणत्याही धातूचा घेऊनये.

तसेच तिजोरीच्या समोर कोणताही देवीदेतांचे फोटो लाऊनये. जर का तुम्ही ज्या कपाटात कपडे ठेवतात त्या कपाटात पैसा ठेवत असला तर ते सर्वात वरती किंवा मध्यभागी ठेवावे. कपाटाच्या सर्वात खाली पैसा ठेऊनये. वास्तू शास्त्रा नुसार अशा पैशात वाढ कधीच होत नाही.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.