ज्वारी आणि नाचणीची भाकरी या मधील सर्वात चांगली भाकरी कोणती आहे
आरोग्य

ज्वारी आणि नाचणीची भाकरी या मधील सर्वात चांगली भाकरी कोणती आहे? या बद्दल तुम्हला माहिती आहे का?

प्रत्येकाच्या घरात भारकी केली जाते. जवळ पास तीन प्रकारच्या भाकरी सर्वांना माहिती असते किंबहुना माहित असेल. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि नाचणीची भाकरी. या तिन्ही भाकरी जरी असल्या तरी त्यांच्या चवीत आणि पौष्टीक प्रकारात अनेक वेगवेगळ्या गोष्टी आढळतात. भाकरी तयार करण्याची पद्धत जवळ पास सारखी असली तरी त्याची चव मात्र वेगळी असते. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नाचणीची आणि बाजरीची भाकरी बनवण्याची पद्धत थोडी फार वेगळी असू शकते.

आपले चांगले आरोग्य राहण्यसाठी भाकरी अवर्जून खाली पाहिजे. ज्वारीची भाकरी हि थंड स्वरूपाची असते. बाजरीची भाकरी हि उष्ण स्वारीपाची असते आणि नाचणीची हि उष्ण किंवा थंड या दोन्ही स्वारीपाची नसून मध्यम प्रकारची असते. भाकरी मध्ये पौष्टीक घटक चांगल्या प्रकारे असल्यामुळे भाकरी आपल्या आरोग्य साठी खुप महत्वाची असते. पण या तीन पैकी कोणती भाकरी अधिक खाली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती सर्वांजवळ नसते त्यामुळे योग्य रित्या भाकरीचे सेवन होत नाही परिणामी त्याचे फायदे आपल्या आरोग्यासाठी होत नाहीत.

या तिन्ही भाकरी पैकी सर्वात लवकर पचनसाठी ज्वारीची भाकरी चांगली आहे. पण काही वेळेस बद्धकोष्ठता या सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच बाजरीची भारकी खण्यसाठी चांगली असते पण ती उष्ण स्वरूपाची असल्यामुळे तिचे जास्तीचे सेवन चांगले नसते. तसेच नाचणीची भाकरी पचना साठी हलकी असून तिचे योग्य प्रमाणत सेवन केल्यास त्याचे फायदे अनेक चांगले आहेत.

नाचणीची भाकरी तुम्ही वर्षभर खाल्ली तरी चालते कारण नाचणीचे पीठ सर्व ऋतू मध्ये फायदेशीर आहे. तसेच ज्वारी थंड आल्यामुळे याचे सेवन जर का तुम्ही उन्हाळ्यात केल्यास त्याचे लाभ खुप चांगले मिळतात. तसेच बाजरीची भाकरी उष्ण आल्यामुळे याचे सेवन थंडीच्या काळात केल्यास त्याचे लाभ आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.

बाजरीच्या भाकरी मुळे कफ आणि वात यावर मात करण्यसाठी खुप उपयुक्त आहे. तसेच ज्वारीची भाकरी खाल्याने कफ कमी होतोच शिवाय पित्ताचा त्रास सुद्धा कमी होण्यास मदत होते. जर का आपण नाचणीची भाकरी खाल्ली तर पित्ताचा त्रास कमी होतॊच शिवाय वात , कफ आणि रक्त शुद्ध करण्याचे काम नाचणीची भाकरी करते.

या तिन्ही भाकरीचे फायदे असंख्य आहेत फक्त आपल्याला कळाले पाहिजे कोणत्या वेळी कोणती भाकरी खाल्ली पाहिजे. योग्य काळात योग्य रित्या भाकरीचे सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळत जातात. असे कधीही ठरवू नका हि भाकरी चांगली हि भाकरी वाईट. त्याच सोबत एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला जितकी भूक आहे तितकेच अन्न आपल्या ताटात घ्या. त्यामुळे अन्नाची नासाडी होणार नाही.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.