दूध कोणते चांगले गाईचे का म्हशीचे ?आणि त्याचे फायदे..
लाईफस्टाईल

दूध कोणते चांगले गाईचे का म्हशीचे ?आणि त्याचे फायदे..

मित्रानो आपल्या जीवनात दुधाला खूप महत्व आहे. आईच्या दुधा नंतर म्हशीच्या आणि गाईच्या दुधाला महत्व आहे. आपण दुधामुळे निरोगी राहण्यास मदत होते,पण दूध हे गाईचे चांगले कि म्हशीचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो त्यामुळे कोणते दूध चांगले आहे हेच समजत नाही ,त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत कि कोणतं दूध आपल्यासाठी चांगले आहे आणि त्याचे आपल्याला कोणते फायदे होतात.

मित्रानो दुधात प्रोटीन हे जास्त प्रमाणात असते, आणि आयुर्वेदीक गुणधर्म असतात. आपल्या सगळ्यांसाठी दूध हे खूप उपयुक्त असते.आपल्यातल्या बऱ्याच जणांना असे वाटते कि गाईचे दूध जास्त पोषक आहे तर काही जणांना असे वाटत असते कि म्हशीचे दूध जास्त पोषक आहे तर आपण पाहुयात कि आपल्या शरीराला ह्या दूधामधील कोणते दूध चांगले आणि पोषक आहे.

मित्रानो दूध कसे ओळखावे तर गाईचे दूध हे थोडे पिवळसर असते आणि पातळ असते. म्हशीचे दूध हे पांढरे असते आणि घट्ट असते. गाईचे दूध हे पचायला हलके असते आणि म्हशीचे दूध हे पचायला जड असते. त्यामुळे लहान मुलांना आईच्या दूधानंतर गाईचे दूध द्यायला सुरु करतात कारण गाईचे दूध पचायला हलके असते आणि लहान मूल हे पचवू शकतो आणि ते दूध लहान मुलांसाठी पोषक असते आणि म्हशीचे दूध हे लहान मुलंसाठी पचायला जड असते. त्यामुळे लहान मुलांसाठी गाईचे दूध चांगले असते ते म्हणजे देशी गाईचं दूध .

मित्रानो म्हशीचे दूध हे पचायला जाड असते. म्हशीच्या दुधातुन आपल्याला व्हिटॅमिन अ मिळते पण गाईच्या दुधातून आपल्याला व्हिटॅमिन अ हे कमी प्रमाणात मिळते. म्हशीच्या दुधात कॅल्सियम जास्त असते ,पण गाईच्या दुधात कॅल्सियम कमी असते . गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात कॅलरीज चे प्रमाण जास्त असते. म्हशीच्या दुधात फॅट हे जास्त प्रमाणात असते आणि गाईच्या दुधात फॅटचे प्रमाण कमी असते. गाईचे दूध हे पचायला हलके आणि पित्तनाशक आहे आणि म्हशीचे दूध हे पचायला जड असते.

म्हशीच्या दुधापासून बनवले जाणारे पनीर ,दही,तूप हे जास्त चविष्ट असते आणि यामुळे वजन वाढण्यास मदत होते.तसेच गाईचे तूप हे लहान मुलांसाठी चांगले असते. गाईचे दूध जर तुमहाला वजन कमी करायचे आहे तर गाईचे दूध पिणे योग्य आहे ,त्यामध्ये फॅटचे प्रमाण कमी असते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. म्हशीच्या दुधात फॅट हे जास्त प्रमाणात असते, त्यामुळे वजन वाढवायचे असल्यास नियमित म्हशीचे दूध हे पिले पाहिजे.

गाईच्या दुध पिल्यामुळे रोगप्रतिकारक सक्ती वाढण्यास मदत होते. गाईचे दुधामुळे लहान मुलांच्या मेंदूचा विकास होण्यास मदत होते, तसेच हाडे बळकट होतात. गाईच्या दुधामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. पण गाईच्या दुधात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते तर माशीच्या दुधात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. म्हशीचे दूध हे हृदयातील कोलेस्ट्रॉल, किडनीचे आजार म्हणजेच मुतखडा असणाऱ्यांनी आवश्य प्यावे त्यामुळे त्यांना फायदा होतो. तसेच हाय बीपी असणाऱ्यांना पण म्हशीचे फादेशीर ठरते.गाईचे दूध हे कॅन्सर ला पण रोखण्यास मदत करत.तसेच गाईच्या दुधात व्हिटॅमिन अ असल्यामुळे डोळ्याच्या तक्रारी दूर होतात.