धार्मिक

रक्षाबंधनाला भावाला राखी बांधताना धाग्याच्या तीनच गाठी का बांधतात, जाणून घ्या यामागील कारण.

दरवर्षी श्रावण महिण्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला आपण रक्षाबंधन दिवस साजरा केला जातो. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बाधते. तसेच बहीण आपल्या भवाच्या प्रगतीसाठी आणि त्याचा जीवनात सतत सुख समृद्धी आणि वैभव यांची कधीच कमी पाडूनये या साठी प्रार्थना करते. भावाच्या हातावर राखी बांधताना राखीच्या धाग्याला किती गाठी बांधाव्यात किंबहुना इतक्याच का गाठी बांधाव्यात याबद्दल थोडकायत माहिती जाणून घेऊ.

जोतिष शास्त्रा नुसार गुरुवारी रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे. याच दिवशी सूर्य द्यापास चतुर्दशी तीथी असणार आहे पंचागानुसार त्याच सोबत पौर्णिमा तिथी असणार आहे.  पौर्णिमा तिथी सकाळी १०. ५८ मिनिटांनी असणार आहे. त्याच बरोबर आपण राखी बाधण्यासाठीचा वेळ सकाळी ९. ५८ मिनिटांनी असून त्रासी ९. १४ मिनिटांनी संपणार आहे.

राखी पौर्णिमाच्या दिवशी राखी बाधण्यासाठी तयारी बहीण करत असते. स्वच्छ पाठ किंवा आसन घेऊन त्याभवती सुंदर रंगोली काढली जाते. त्या नंतर औक्षणासाठी ताट तयार केले जते. त्यात गधं , अक्षदा, एक दिवा आणि कोणतीही एक सोण्याची वस्तू. ज्या वेळेस भाऊ पाठावर बसल्यानंतर त्याला गधं लावून औक्षण केले जाते, आणि हातावर राखी बांधली जाते. त्या राखीच्या घाग्याल दोन तर कोणी तीन गाठी बांधतात.

तीन गाठी बाधण्यामागे काही शास्त्रीय कारणे सांगितल्या जातात. तीन गाठी बांधण्यामागे त्री देवाशी सबंध सांगितला जातो . या सुष्टीचा संभाळ हे त्री देव करत म्हणजेच ब्रम्हा, विष्णू, महेश, होय. त्यानी भावाचे सुद्धा रक्षण करावे तसेच त्याला येणाऱ्या अडचणी दूर करण्यसाठी त्याच्या पाठीशी उभे रहावे. तसेच भावावर कृपा दृष्टी ठेवावी म्हणून त्री देवाचे स्मरण ठेऊन तीन गाठी बांधल्या जातात.

हाताच्या मनगटावर बांधलेली राखी हि त्यातील ऋणानुं बंधनाशी असतो. राखी बांधतांनापहिली गाठ हि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी तर दुसरी गाठ हि बहिणीच्या दीर्घ आयुष्यसाठी असते तर तिसरी गाठ ही बहीण भावाच्या नात्यातील आनंद आणि गोडवा सतत टिकून रहावा यासाठी आहे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.