धार्मिक

मकरसंक्रांतीला सुवासिनी ह्या नवीन बांगड्या का भरतात ? बांगड्यांचे महत्व आणि नियम.

बांगडी हा एक महिलांचा अलंकार आहे. महिलांना सोळा शृंगारापैकी काही अलंकार हे असतातच, त्यापैकी म्हणजे बांगडी, टिकली, नथ किंवा मोरनी ,मंगळसूत्र ,जोडवी हे तर प्रत्येक सुवासिनीच्या श्रुंगारात असतंच,त्याशिवाय सुवासिनीचा शृंगार पूर्णच होत नाही. प्रत्येक महिलेला हा सगळं शृंगार करायला आवडत असतो. जरी रोज सगळ्या महिला हा शृंगार नसतील करत पण सणासुदीला हा सगळं शृंगार ह्या महिला करत असतात.

बांगड्या ह्या खूप महत्वाच्या असतात. त्या महिलांच्या आयुष्यात खूप महत्वाच्या असतात. महिलांनी काळा रंग सोडून सगळ्या रंगाच्या बांगड्या त्या घालू शकतात. काळ्या रंगाच्या बांगड्या महिला शक्यतो घालत नाहीत. महिलांसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या शुभ मानल्या जातात. हिरव्या रंगाच्या बांगड्या जर महिलांनी घातल्या तर त्या महिलांना बुध ग्रह हा प्रसन्न होतो असं मानलं जात. त्यामुळे हिरव्या बांगड्या ह्या घातल्या जातात.

एखादया मुलीच लग्न ठरलेलं असेल तर त्या मुलीला हिरव्या रंगाचा चुडा हा घातला जातो.त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या शुभ मानल्या जातात.आजकाल महिला ह्या काचेच्या बांगड्याचा ऐवजी प्लॅस्टिकच्या बांगड्या वापरतात. पण काचेच्या बांगड्या ह्या नेहमी हातात घालाव्यात , पण त्याचा तोटाही होतो काचेची बांगडी जर घालताना फुटली तर आपल्या हातला लागु शकत.त्यामुळे प्लॅस्टिकच्या बांगड्या असल्या तरी चालतात पण एक तरी काचेची बांगडी हि असावी.

महिलांनि बांगडी का घालावी असं प्रश्न हा सगळ्यांनाच पडत असतो तर बांगड्या घातल्यामुळे महिला चालताना बांगड्याचे घर्षण होते तसेच त्या बांगड्याचा आवाज येतो त्यामुळे आपलं घर हे सकारात्मक होत. तसेच घर हे प्रसन्न होत.

महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या कमी होतात आणि महिलांची पाळीही नियमित येण्यास मदत होते. तसेच बीपी चा देखील त्रास कमी होण्यास मदत होते. महिलांनी बांगड्या ह्या घातल्या पाहिजेत .बांगड्या न घातल्याने आताच्या महिलांना हे सगळे त्रास होण्यास सुरुवात झाली आहे. आधीच्या काळात महिलांना कधी कोणते आजार झाले नाहीत का तर त्या सगळं शृंगार करत होत्या.

मकरसंक्रांत हा नवीन वर्षाला पहिला सण असतो. तसेच महिला ह्या सणाच्या दिवशी नवीन बांगड्या घालतात.तसेच मकरसंक्रातील लाखेच्या बांगड्या ह्या घातल्या जातत्. मकरसंक्रातील लाखेचा चुडा घालण्याला फार महत्व आहे.

त्यामुळे ह्या संक्रातीला तुम्ही लाकेचा चुडा हा नक्की घालावा.लाखेचा चुडा हा गरम करून घातला जातात.लंकेचा चुडा घालताना असं म्हणतात कि, “लाख मोलाचा लाखेचा चुडा, सुखाने राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा ” असं म्हणत महिला हा चुडा घालतात. तर महिलांनो तुम्ही ह्या मकरसंक्रांतीला नकी हा लाखेचा चुडा हा नक्की घाला .