हृदयासाठी घातक असे बॅड कोलेस्ट्रॉल न वाढवणारे तूप बनवा अश्या पद्धतीने

हृदयासाठी घातक असे बॅड कोलेस्ट्रॉल न वाढवणारे तूप बनवा अश्या पद्धतीने …

मित्रानो आपल्या भारतातील जेवणामध्ये आणि आयुर्वेदात साजूक तुपाला खूप महत्व आहे. तूप हे दुग्धजन्य पदार्थ आहे . तुपामध्ये व्हिटॅमिन इ अधिक प्रमाणात असते तसेच तूप हे स्मृतिभ्रश ,हृदयरोग आणि कर्क रोगापासून वाचवते. तूप हे रोज खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तूप खाल्याने आपली हाडे हि मजबूत होतात आणि आपली पचन शक्ती सुधारते.रोज तूप खाल्याने आपण जे फायबर खातो, त्याचे पचन होऊन बुटेरिक ऍसिड निर्माण होऊन आपलं पोट देखील साफ होण्यास मदत होते. बुटेरिक ऍसिड मुळे आपली चरबी जाळण्यास मदत होते. तूप हे बुद्धिवर्धक देखील आहे,. आपल्या डोळ्यांसाठी तूप हे चांगले आहे. तूप खाल्याने पित्त देखील कमी होते. तूप हे रोज खाल्याने पित्त कमी होण्यास मदत होते. तूप हे पित्तनाशक आहे.

१)आपण तूप बनवताना आपण हळदी चा वापर करणार आहोत हळदीचा आपल्या जीवनात खूप उपयोग होतो. हळदीचा आपण फेस पॅक बनवतो. आपल्याला जर कुठे जखम झाली तर हळदीचा आपण वापर खरतो त्यामुळे जखम हि लवकर भरुन येते. तसेच आज आपण हळदयुक्त तूप कस बनवायचं हे शिकुयात. हळदयुक्त तूप बनवण्यासाठी आप एक कप तूप आणि एक चमचा हळद घेणार आहोत. आणि अर्धा चमचा काली मिरी पूड घेऊन हे सगळं मिक्स करून आपण हवाबंद डब्यात ठेवा .

२)तूप बनवण्याची दुसरी पद्धत ,तुळस हि आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते. तुशीच्या पानामध्ये व्हिटॅमिन अ ,व्हिट्यामिन क आणि व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असतात. आपला मानसिक तणाव हि तुळस दूर करते. लोण्यापासून तूप बनवताना लोणी जेव्हा उकळेल तेव्हा त्यामध्ये तुळशीची थोडी पाने टाकावीत आणि ते तूप व्यवस्थित काढून घ्यावे मन्हजे त्यात तुळशीच्या पानाचा अर्क उतरतो आणि तुपाला वेगळा सुगंध येतो.

३)लसूण खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सगळ्या आजारावर लसूण हा खूप गुणकारी ठरतो. एका भांड्यात तूप घ्या आणि त्यात लसणाच्या पाकळ्या चिरून घ्या आणि त्या तुपात टाकून पाच मिनिटे ते तूप मंद आचेवर उकळून घ्या आणि गॅस बंद करू त्या भांड्यावर झाकण ठेऊन द्या झाले आपले लसुणयुक्त तूप तयार , किंवा तुम्ही लोणी काढवताना देखील लसणाच्या पाकळ्या घालून लसुणयुक्त तूप बनवू शकता.

४)दालचिनी हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे काम करते.आपल्या सोंदर्यसाठी सुद्धा फायदेशीर आहे. आपण दालचिनीचे तूप हे दोन प्रकारे बनवू शकतो. आपण लोणी काढवताना त्यात दालचिनी च्या काडया घालून ते लोणी चांगल्या प्रकारे काढून घेऊन नंतर ते गाळून घ्यावे झाले तयार दालचिनीयुक्त तूप . दुसरी पद्धत अशी आहे आपण एका भांडयात तूप घेऊन त्यात दालचिनीच्या काड्या घालून ते तूप पाच मिनिटे उकळून घ्यायचे आहे आणि गाळून घायचे .

५)कपूराची ओळख फक्त पूजेसाठीच नाही होत, त्याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठीसुद्धा होतो. आपल्याला खाण्यासाठी असा कपूर देखील बाजारात आहे. कपूर हा पचनासाठी उपयुक्त आहे आणि कपूर हा झाडाच्या सालीपासून तयार होतो. सांधे दुखीवर कपूर हा खूप गुणकारी आहे तसेच वेदना देखील कमी करण्याचे काम कापूर करतो. जो कपूर खाण्यासाठी असतो असाएक दोन तुकडे कपूराचे टाकून तूप पाच मिनिटे उकळून घ्या आणि थंड झाल्यावर , ते तूप गाळून एका बरणीत भरून ठेवा.