लसूण खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का
आरोग्य

लसूण खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

मित्रांनो ग्रीक तज्ज्ञ असे म्हणतात कि, “आपण जेवण हे औषधासारखे खा,नाहीतर औषध हे जेवण म्हणून घ्यावे लागतील “. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जेवणात लसणाचा वापर हा आवश्यक केला पाहिजे,असं हि ते सांगतात. लसूण हा खूप आयुर्वेदिक आहे .तसेच लसूण हा आरोग्यासाठी खूप चांगला असतो.लासनाला एक वेगळ्याप्रकारची चव असते,त्यामुळे आपल्या जेवणाला चॅन अशी चव येते.

लसणात मॅग्नेशियम,व्हिट्यामिन सी ,फायबर,सेलेनियम आहे. तसेच कॅल्शियम ,पोट्याशियम ,फॉस्फरस ,लोह,व्हिट्यामिन बी १ याचे प्रमाण देखील अधिक असते. लसणामध्ये आपल्याला लागणारे पोषक घटक असतात. लसूण हा सगळ्या आजारावर खूप गुणकारी आहे. आपण रोजच्या जेवणात जर लसणाचा वापर केल्यास आपण आजारापासून दूर राहू शकते.

मित्रांनो आपल्या भारतातील सगळ्याच घरात अनेक भाज्यांना ,वरनाला लसणाची फोडणी हि दिली जाते.तसेच लसूण हा आपल्या शरीरातील रक्ताच्या गाठी पातळ करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याप्रमाणेच हृदयासाठी सुद्धा लसूण खूप उपयोगी आहे. तसेच हिवाळ्यात आपले शरीर उबदार ठेवण्याचे मुख्य काम हा लसूण करते. तसेच सर्दी-खोकल्यासाठी तर खूपच गुणकारी असतो लसूण.

मित्रांनो लसणाच्या ह्या फायद्याप्रमाणेच आपण अजून लसूण खाण्याचे फायदे हे खालीलप्रमाणे जाणून घेऊयात.

१)औषधी लसूण:-

लसूण हि कांद्यासारखी एक वनस्पती आहे.लसणाच्या एका गद्यात १० ते २० लसणाच्या कळ्या असतात.लसूण हा भारतासह अनेक देशात पिकवला जातो. लसणाचा वास हा थोडा उग्र असतो. प्राचीनकाळापासून लावून हा औषधी मानला जातो. तसेच लसूण हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. लसणाचा वापर हा रक्त पातळ करण्यासाठी आणि त्वचारोगासाठी उपयोगी मानला जातो. लसूण हा खूप औषधी आहे.

२)ब्लडप्रेशर कमी करते:-

हार्ट अटॅक ,हायपरटेन्शन ,ब्लड प्रेशर ,स्ट्रोक ह्या सगळ्या आजारावर लसूण हा खूप फायदेशीर ठरतो. याचप्रमाणे ब्लड प्रेशर कमी करण्याचे काम लसूण करते.तसेच अभ्यासावरून असे लक्षात आलेले आहे कि,एका आठवड्यात ६००-१५०० ग्राम एवढाच लसूण हा ब्लड प्रेशर लोकांसाठी खाणे फायदेशीर आहे. तसेच एका दिवसात ४ लसणाच्या पाकळ्या ह्या खाल्या तर कोणत्याही औषधाची गरज आपल्याला पडणार आहे.

)सर्दी- तापापासून रक्षण करते:-

लसूण हा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. लावून हा नियमित खाणारे लोक हे कमी आजारी पडतात. तसेच लसूण हा झाला तर सर्दी आणि ताप हा दीड दिवसात कमी होण्यास मदत होते. याचप्रमाणे जे लोक लसूण खात नाहीत ते जास्त आजारी पडतात असं दिसून येत. तुम्हाला जर आजारापासून दूर राहायचं असेल तर नियमित लसूण हा खाल्ला पाहिजे. लसणात खूप पोषक घटक असल्यामुळे तुम आरोग्य हे चांगलं राहू शकत.

)कोलेस्ट्रॉल कमी करते:-

लसणाचे आपण जर नियमित सेवन केले तर आपले कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच आपण हार्ट अटॅक येण्यापासून वाचू शकतो.तसेच ज्या लोकांचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे अधिक आहे त्यांनी नियमित लसूण हा खाल्ला तर तुमच्या कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

५)अलजाइमार आणि डिमेंशियापासून वाचवते:-

अलजाइमार आणि डिमेंशिया हे मेंदूच्या निगडित आजार आहेत. लसणात जे अँटीऑक्ससीड ते या आजारापासून वाचवतात.त्यामुळे हा आजार असणाऱ्यांनी लसूण हा नियमित खाल्ला पाहिजे. तसेच लसूण हा रक्त पातळ करण्यास मदत करते.रक्त हे पातळ झाल्यास आपल्या मेंदूपर्यंत रक्त पुरवठा हा चांगला होतो. लसूण हा आपल्याला सगळ्या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करते.तसेच लावून हा मानसिक आरोग्यासाठी सुद्धा उपयोगी पडतो.

६)लसूण आयुष्य वाढवते:-

लसूण हा नियमित खाल्याने आपले आरोग्य सुधारते आणि त्यामुळे आपले आयुष्य वाढण्यास मदत होते. लसूण हा आपल्याला दीर्घायू बनवतो. लसणाचे रोज सेवन केल्यामुळे आपण कमी आजारी पडतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.लसूण हा सगळ्या आजारावर औषधाचे काम करते.लसूण खाल्याने आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि आपले आयुष्य वाढते.लसूण खाल्याने अनेकप्रकारचे रोग बरे होण्यास मदत होते.