नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे, नाचणीची पौष्टिक भाकरी खाण्याचे फायदे, benefits-of-eating-nutritious-ragi-bread
आरोग्य

नाचणीची पौष्टिक भाकरी खाण्याचे फायदे…

मित्रानो नाचणी हि आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आहे . नाचणीचे भरपूर फायदे आहेत. नाचणी खाल्याने आपली हाडे मजबूत होतात,म्हणूनच नाचणी सत्व लहान मुलांना देतात कारण त्यांची हाडे मजबूत होतात तसेच कॅल्शिअम ची कमतरता होत नाही.

आजकाल डाएट मध्ये सुद्दा नाचणीचं वापर जास्त प्रमाणात केला जातो. नाचणी हि वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. नाचणीमध्ये ट्रिप्टोफॅन हे अमिनो ऍसिड असते ते भुक कमी करून आपले वजन नियंत्रणात आणते आणि नाचणी मध्ये फायबरचे खूप जास्त प्रमाण आहे त्यामुळे भुक देखील कमी लागते.

नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे

नाचणी मध्ये लोह ,व्हिटॅमिन क ,पोट्यशियम ,फायबर, प्रोटीन ,झिंक मिळते. नाचणी हि अनेक प्रकारे खाता येते.जसेकी, नाचणी सत्व, नाचणीचा उपमा, नाचणीचा डोसा, नाचणीची भाकरी अशा विविध प्रकारे नाचणी खाता य्रेते.पण मित्रानो आपण नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे खालील प्रमाणे बघणार आहोत.

१) पोषक घटक-

नाचणीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.नाचणीमध्ये कॅल्शिअम ,प्रोटीन ,लोह ,फायबर ,झिंक पोट्याशिअम अशी अनेकप्रकारची पोषण तत्वे असतात. तसेच नाचणीची भाकरी खाल्याने आपल्या शरीराला योग्य ते पोषण मिळते.

२) वजन कमी होण्यास मदत-

नाचणीची भाकरीही मऊ आणि लुसलुशीत होते,तसेच नाचणीची भाकरीही पचायला खूप हलकी असते आणि नाचणी मध्ये अमिनो ऍसिड असते, त्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. नाचणीमध्ये फायबर हे जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्याला भूक देखील कमी लागते आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.

३) डायबिटीस नियंत्रणात राहते-

ज्या लोकांना डायबिटीस असतो अश्या लोकांना डॉक्टर सल्ला देतात कि ,नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात. नाचणीमध्ये फाइबरचे प्रमाण जास्त असते. नाचणीतील फायबरमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते,आणि डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४) हाडे मजबूत होतात-

नाचणीमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते आणि आपली हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शिअमची गरज असते.नाचणीची भाकरी खाल्याने आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते त्यामुळे तुमची हाडे जर कमकुवत असतील तर नाचणीची भाकरी तुम्ही नक्की खाल्लीच
पाहिजे नाचणीची भाकरी खाल्यानी आपल्याला शांत आणि चांगली झोप लागण्यास मदत होते.

५) उच्च रक्तदाब कमी होतो-

मित्रांनो ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अस्या लोकांनी नाचणीची भाकरीही आवश्य खायला पाहिजे. नाचणीची भाकरी खाल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि मग उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तसेच नाचणीची भाकरी खाल्याने आपले हृदय चांगले होण्यास मदत होते.

६) ऑसिडिटी कमी करते-

ज्या लोकांना ऑसिडिटीचा त्रास होत असतो किंवा पित्ताचा त्रास होत असतो अश्या लोकांसाठी नाचणीची भाकरी खूप गुणकारी आहे. नाचणीची भाकरी हि थंड असते त्यामुळे ऑसिडिटी होत नाही आणि ऑसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या आहारात नाचणीची भाकरी हि असलीच पाहिजे.
हे पण वाचा:- तुमचे केस गळतात का ?तर नक्की वाचा ,केसांची मुळे मजबूत करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय 

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.