धार्मिक

देवपूजा कशी करावी, लोक देवपूजा करताना करतात ह्या चुका म्हणून देव प्रसन्न होत नाही.

मित्रानो देवपूजा काही जणांकडून अश्या काही चुका होतात, त्यामुळे त्यांना देव हे पावत नाही.तर काही जणांना देवपूजा नेमकं कशी करतात हे बऱ्याच लोकांना हे माहित नसत. देवपूजा करताना काही महत्वाचें नियम हे तुम्हाला माहित असले पाहिजेत.देवपूजा करताना हे नियम तुम्ही पाळले पाहिजेत ,त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्या वर प्रसन्न राहील.

घरात देवपूजा हि दररोज केली पाहिजे. दररोज नित्यनियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते. देवाची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे,म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्याच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते.

देवाची पूजेसाठी काही नियम:-

१)देव पूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी.
२)देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे.तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे.
३)पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला गंध लावून घ्यावे.
४)पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे.
५)देवपूजा करताना मध्येच उठू नये.

६)पूजा करताना घंटा हि देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी.
७)शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा.
८)देवपूजा करताना समई हि आपल्या डाव्या बाजूला ठेवावी.
९)तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे.
१०)विड्याची पाने पूजेसाठी ठेवताना ते नेहमी पालथे आणि देवाकडे देठ करावे.
११)नारळ ठेवताना नारळाची शेंडी हि देवाकडे करावी.

१२) देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये.तसेच देवघरात चप्पल घालून येऊ नये.

देवपूजा कशी करावी:-
सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे.
देवाचे समरण करत पूजेला सुरुवात करावी.
कपाळाला गंध लावून घ्यावा .
समई आणि उदबत्ती लावून घ्यावे आणि समई ला गंध लावून घ्यावा.
त्यानंतर घंटीची पूजा करावी आणि घंटी वाजवावी.
सगळ्या देवांना पाण्याने स्नान घालावे आणि स्वच्छ पुसून सगळ्या देवांना गंध लावावा.
तसेच सगळ्या देवांना फुल वाहवेत.नंतर नैवद्य दाखूवुन झाल्यावर तुपाचे निरंजन लावून आरती करावी .