धार्मिक

नखे कधी काढावीत ह्याबद्दल सविस्तर माहिती.

नखे कधी काढावीत? चुकीच्या दिवशी नखे काढल्याने घरात दरिद्रता येऊ शकते, नखांचा संबंध शनी देवाशी आहे. नखे अस्वछ असतील तर कुंडलीतील शनी ग्रह कुपीत होतो त्यामुळे कामे होता होता बिघडतात, कधीतरी खोटा आळ देखील येण्याची शक्यता असते.

सोमवारी नखे काढणे शुभ समजले जाते सोमवार हा शिव महादेव आणि चंद्रदेवांचा वार आहे या दिवशी नखे कापल्याने व्यक्तीमधील तमोगुण कमी होतात सोबतच घरातील आर्थिक स्थिती मजबूत बनते मंगळवार हा हनुमान आणि मंगळ ग्रहाचा वार आहे या दिवशी नखे काढणे अशुभ असते मात्र तुमच्या डोक्यावर कर्ज असेल तर मंगळवारी नखे कापल्याने कर्ज कमी होण्यात मदत होते.

बुधवार हा श्री गणेशांचा वार व बुध ग्रहाशी संबंधी वार ह्या दिवशी नखे अवश्य काढावीत धनलाभ तर होतोच सोबतच प्रगतीचे मार्ग देखील उघडे होतात. गुरुवार भगवान विष्णू आणि देवगुरु बृहुस्पती ह्यांचा वार, ह्या दिवशी आपण नखे चुकूनही काढू नये दुर्भाग्य आपला पिच्छा सोडणार नाही. शुक्रवार ह्या दिवशी तुम्ही नखे काढू शकता. ह्या वारी नखे काढल्याने नातेसम्बधात गोडवा येतो, भौतिक सुखात वृद्धी होते.

शनिवार नखे कापू नयेत या दिवशी नखे कापल्याने शनिदेव रुष्ट होतात साडेसाती मागे लागते. रविवारचा दिवस नखे काढण्यासाठी उत्तम मानला जातो या दिवशी नखे काढल्याने भाग्य म्हणजेच नशिबाची साथ मिळून जाते. मात्र लक्षात ठेवा कि उपवास किंवा व्रत असतील तर नखे चुकूनही काढू नका व्रताचे संपूर्ण फळ मिळणार नाही. एकादशी, चतुर्थी, अमावस्या या दिवशी नखे कापू नयेत. रात्रीच्या वेळी नखे कापू नका.

कुंडलीतील बलवान व शुभ ग्रह कमजोर पडतो परिणामी राहू केतू, शनी या पापी ग्रहांचा प्रभाव वाढतो व जीवन कष्टमय बनते. नखे काढण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे दशमी तिथी. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी या दिवशी जयाविजया शक्ती मनुष्या सोबत असतात. जर तुम्हाला बाधा नजरदोष घरात कोणी काही केलं असेल तर दशमी तिथीला नखे कापा. या सर्व बाधा निघून जातील. पैसे येणायचा मार्गातील अडचणी दूर होतील, भाग्योदय होईल.

नखे कधी कोणत्या वारी काढावीत याबद्दल तुमच्या मनात कोणत्याही शंका राहिल्या नसतील नखांप्रमाणे केस कधी कापायचे हे जर जाणून घेईचे असेल तर केस असे नक्की लिहा. धन्यवाद.