धार्मिक

मार्गशीष गुरुवारी करा हे उपाय, तुमच्या अडचणी, गरिबी, आजारपण, संकटे संपतील.

मित्रानो हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीष महिना हा खूप पवित्र मानला जातो. हा महिना भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला खूप प्रिय आहे असं म्हणलं जात. मार्गशीष महिन्यात सगळ्या महिला ह्या महालक्ष्मीचं व्रत करतात .आपल्या घरात धन-धान्य आणि सुख समृद्धी यावी यासाठी महिला महालश्मीचं व्रत करतात.

मार्गशीष महिन्यातील गुरुवारची व्रत करताना आपण हे उपाय केले तर आपल्या गृहातील गुरु हा प्रसन्न होऊ शकतो, जर गुरु ग्रह प्रसन्न झाला तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. आपल्या अडचणी , आजारपण आणि गरिबी सुद्धा दूर होण्यास मदत मिळते. तसेच आपण हे व्रत करताना हे आज आपण मार्गशीष गुरुवारी कोणकोणते उपाय करायचे आहेत ते आपण पुढीलप्रमाणे पाहुयात.

मित्रानो मार्गशीष गुरुवारची व्रत करताना आपण सकाळी लवकर उठून स्वच्छ अशी आंघोळ करून घेयची आणि अंघोळ करताना त्या अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकुन अंघोळ करायची तसेच अंघोळ करताना “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः “हा विष्णू देवांचा जप करत अंघोळ करायची आहे आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत , पिवळ्या रंगाचे कपडे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही एक छोटा पिवळा रुमाल सोबत घेऊन बसलात तारि चालेल.

देवघरातील देवांची देवपूजा करून घेयची आहे आणि देवपूजा करून झाल्यावर देवांना पिवळ्या रंगाचा नैवेद्य तुम्ही दाखव नाही तर केळीचा नैवेद्य दाखवा आणि दिवसभरात तुम्ही केळीच्या झाडाची पूजा करावी कारण त्या झाडात विष्णूचा वास असतो.पूजा करताना भगवान विष्णूचा जप हा १०८ वेळा करावा आणि त्या झाडाखाली के दिवा देखील लावावा आणि तुमची इच्छा जी आहे ती या केळीच्या झाडाला सांगा, ती इच्छा तुमची पूर्ण होईल.

मित्रानो तुम्ही तुमच्या कपाळाला पिवळा गंध लावावा आणि पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे सेवन तुम्ही नक्की करा तसेच गुळ -फुटण्याचा नैवेद्य देखील दाखवू शकतो.नैवेद्य दाखवताना तुळशी पत्र हे नेहमी ठेवावे,तुमच्या घरात वाद-विवाद होतात, पैश्याची कमतरता आहे,तुम्हाला मूल-बाळ होत नाही,नोकरी संबंधित समस्या आहे या सगळ्या समस्यांसाठी हे उपाय आहेत.

तुम्हाला जर नोकरी बद्दल समस्या आहे अस्या लोकांनी पिवळ्या रंगाची मिठाई चा दान करावं, विध्यार्थी धार्मिक पुस्तकांचं दान करावं त्यांना नक्की फायदा होईल, तसेच व्यवसाय असणाऱ्यांनी विष्णू-नारायणाच्या मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाच्या लाडूचा प्रसाद दाखवावा , त्यांना नक्की फायदा होईल. तुमच्या देवघरात एक हळकुंडाची माळ अडकवा आणि दररोज देवांची पूजा हि रोज करावी तुम्हाला नक्की यश मिळेल.

मित्रांना यावर्षी मार्गशीष महिन्यास एकूण पाच गुरुवार आले आहेत. तुम्हाला सांगितलेले उपाय सांगितले आहेत ते उपास करताना तुम्ही घरातील मोठ्यानं वाईट बोलू नये, गाईला मारहाण करू नये किंवा तिला हाकलू नये, मद्यपान करू नये, पैसे उसने देऊ नये आणि देवाची पूजा झाल्यावर तुळशीची सुद्धा पूजा करावी आणि दुधाचा नैवेद्य दाखवावा आणि आपली इच्छा हि तुळशी मातेला सांगावी ती नक्की पूर्ण होऊ शकते.

मित्रानो मार्गशीष गुरुवारी तुम्ही हे उपाय नक्की करा तुमची सगळी संकटे दूर होतील.तुमच्या सगळ्या इच्छा पूर होऊ शकतात. तुम्हाला जर हे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आम्हला कंमेन्ट करून नक्की सांगा, धन्यवाद !