किचन टिप्स

सोयाबीन खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

मित्रानो सोयाबीनमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे शाकाहारी लोक ह्याचे सेवन करतात. सोयाबीन खाण्याचे आरोग्यदायी फायदे, अनेक असून त्या पासून अनेक पदार्थ बनवले जातात जसे कि,सोयाबीनपासून तेल सुद्धा बनवले जाते. सोयाबीन हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. सोयाबीन खाल्यामुळे भरपूर प्रमाणात आपल्या ला फायदे होतात.

सोयाबीनमध्ये प्रोटीन,मिनरल्स आणि व्हिट्यामिन्स भरपूर प्रमाण आहेत.मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी सोयाबीन च तेल खूप चांगलं असत. तसेच मासिक पाळीच्या संमसेसाठी सुद्धा सोयाबीन खाल्यानी फायदा असतो.परंतु सोयाबीन हे कधी कच्च खाऊ नये.सोयाबीन हे नेहमी भिजवून खावे.तसेच सोयाबीन चन्ग्स सुद्धा थोडावेळ भिजवून त्याची भाजी करावी.

सोयाबीन खाण्याचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे सांगितलेले आहेत.

१)शांत झोप लागते:-

सोयाबीन खाल्याने झोप हि शांत लागते.सोयाबीनमध्ये झोपेच्या समस्या दूर करण्याचा गुणधर्म आहे.तसेच तज्ञाच्या सल्यानुसार सोयाबीन खाल्याने झोपेच्या समस्या ह्या कमी होतात आणि निद्रानाशेचा त्रास कमी होण्यास मदत होते.सोयाबीनमध्ये मॅग्नेशियम चे प्रमाण आदिक असते, त्यामुळे झोपेची गुणवत्ता हि वाढते आणि झोप चांगली होण्यास मदत मिळते.

२)रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते:-

सोयबीमध्ये लोह आणि कॉपर हे मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळे सोयाबीन खाल्यामुळे रक्त पेशीत वाढ होते.आपल्या शरीरात रक्त पेशी वाढल्यामुळे रक्ताभिसर सुधारते.त्यामुळे ऑक्सिजन देखील सुधारते. त्यामुळे सोयाबीन हे नियमित खाल्ले पाहिजे.

३)मधुमेह नियंत्रित राहतो:-

मधुमेह असणाऱ्या लोकांना आपण नेमकं काय खावं ?हा प्रश्न निर्माण होत असतो.त्यामुळे मधुमेहांसाठी सोयाबीन हे अतिशय योग्य आहे., सोयाबीन हे शरीरातील साखर कमी करण्याचं काम करत असत.तसेच सोयाबीन खाल्यानी कोलेष्ट्रॉल चे प्रमाण देखील वाढत नाही.मधुमेह असणाऱ्यांनी नेहमी गहू दळून आणताना त्या गव्हात थोडं सोयाबीन टाकून दळून आणावं आणि त्याच्या पोळ्या खाल्या पाहिजेत, असे केल्यास त्यांना खूप फायदा होतो.

४)हृदयाचे आरोग्य चांगले राहते:-

सोयाबीन हे नियमित खाल्याने आपल्या हृदया संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.सोयाबीन खाल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.आपल्या हृदयासाठी गुड कोलेस्ट्रॉल ची खूप गरज असते.त्यामुळे सोयाबीन हे नियमित खाल्ले पाहिजे.

५)गर्भवती महिलांना उपयुक्त:-

सोयाबीनमध्ये फॉलिक ऍसिड हे भरपूर प्रमाणात असते आणि फॉलिक ऍसिडची गर्भवती महिलांना खूप गरज असते. त्यामुळे गर्भवती महिलांनी सोयाबीन खाणे खूप गरजेचे असते.सोयाबीनमध्ये बीकॉम्प्लेक्स सुद्धा असते आणि खूप मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात.तसेच सोयाबीन खाल्यामुळे गर्भाची वाढ हि योग्य प्रमाणात होते आणि प्रसूती हि सुलभरीत्या होण्यास मदत होते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.