देवघरात दिवा कोणत्या दिशेला लावावा, Also in which direction the lamp should be placed in the temple
धार्मिक

साक्षात महालक्ष्मी घरात राहण्यसाठी, पूजा करताना दिवा आशा पद्धतीने लावा.

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्याला माहीत असेल घरात आपण पूजा करताना देवासमोर दिवा लावतो पण दिवा कश्या पद्धतीने लावावा यबद्दल खुप कमी लोकांना माहिती आहे, आपण आपल्या आजच्या लेखामध्ये देवासमोर दिवा कसा लावावा तसेच देवघरात दिवा कोणत्या दिशेला लावावा याबद्दल माहिते जाणून घेणार आहोत. आपण देवाची पूजा करताना देवा समोर दिवा लावतो कारण दिवा लावल्या शिवाय देवपूजा पुर्ण होत नाही तसेच पूजा देवापर्यंत पोहचत नाही; म्हणून देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावावा. आज आपण दिवा कसा लावावा, तेलाचा तसेच तुपाचा दिवा कसा व कोठे लावावा, आणि यामुळे धन तसेच सुख समृद्धी कशी प्राप्त होते याबद्दल माहित जाणून घेऊया.

देवघरात दिवा कोणत्या दिशेला लावावा

मित्रांनो घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक गोष्टी बाहेर जातात. दिवा लावण्याचे काही नियम आहेत, दिवा कसा व कोठे लावावा, दिवा लावताना काही गोष्टी कडे लक्ष द्याचे आहे, दिवा लावताना दिवा स्वच्छ घासून पुसून घ्यावा, दिवा तुटलेला असू नये, तेल गाळणारा पण असू नये; कोणताही दिवा लावण्याच्या आगोदर तो चांगला स्वच्छ करून घ्यावा; काही घरामध्ये दिव्यावर तेलाचा थर आलेला असतो, असाच दिवा लावला जातो, आशा ठिकाणी भगवंत कधीच प्रसन्न होणार नाही. कारण ज्या ठिकाणी स्वच्छ त्या ठिकाणी भगवंतांच वास असतो. म्हणून घरात दोन दिवे असावे, रोज एक दिवा बदलावा.

मित्रांनो काही घरात तेलाचा तर काही ठिकाणी तुपाचा दिवा लावला जातो. तेलाचा दिवा कष्ट, बाधा, संकटे दुर होण्यसाठी लावला जातो, तर तुपाचा दिवा धन समृद्धी, शांतिः प्राप्ती साठी लावला जातो तसाच मनोकामना पुर्ण होण्यसाठी पण तुपाचा दिवा लावतात. ज्यांच्या घरी शुद्ध गाईचे तूप असेल त्यानी रोज तुपाचा दिवा लावावा.

तुपाचा दिवा व तेलाचा दिवा असे दोन दिवे असता कोणता दिवा कोठे लावावा यासाठी काही नियम असतात, हे नियम पूर्ण केल्यावर आपली पूजा लाभदायक होते. तुपाचा दिवा आपल्या उजव्या बाजूला म्हणजे देवघरच्या डाव्या बाजूला लावावा. तसेच तेलाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला म्हणज्ये देवघरच्या उजव्या बाजूला लावावा. आपण मंदिरात गेल्यावर हे पहात असतो, आपण आशा प्रकारे दिवा लावल्यास आपल्यला फायदा नक्कीच होतो.

त्याच बरोबर दिव्याची वात कोणत्या दिशाला असावी या बद्दल काही नियम आहेत, आपले देवघर नेहमी ईशान्य दिशाला असावे, ज्यावेळी आपण दिवा लावतो त्यावेळी दिव्याची वात पूर्व किंवा उत्तर दिशाला असावी. पश्चिम किंवा दक्षिण दिशाला असूनये, पूर्व किंवा उत्तर दिशेला दिव्यची जोत असल्यस धन प्रेप्तीचे योग बनतात. व मनोकामनाची पूर्णतः होते.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

One Reply to “साक्षात महालक्ष्मी घरात राहण्यसाठी, पूजा करताना दिवा आशा पद्धतीने लावा.

Comments are closed.