आरोग्य धार्मिक

जेवण करताना या बारा गोष्टी नक्की लक्षात ठेवा. जेवणाचे हे नियम लक्षात ठेवा.

अनेक असे लोक आहेत. ज्यांना जेवण करताना कोणत्या गोष्टी करायला नको असतात हे सुद्धा त्यांना माहित नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म! आपण असे बोलतो तरी सुद्धा नकळत आपल्या हातून अन्नाचा आपमान होतो. जेवण करताना कोणते नियम पळायला हवे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जेवण करताना या बारा नियमनाचे पालन नक्की करा. अन्नपूर्ण देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नक्की राहील.

पहिलाच खुप साधा आणि सोपा नियम आहे. तरी सुद्धा आपण यामध्ये सतत चुकत असतोत. जर का पण काही कामासाठी घराबाहेर गेलो असेल आणि परत घरी आपल्यावर लगेच जेवण करायला बसूनये. घरी आल्यावर हात आणि पाय स्वच्छ धुवून नंतर जेवण करायला बसावे. यामुळे इतर फायदे म्हणजे आपण आजारी पडणार नाही. तसेच आपल्या पायाला आणि हाताला लागलेली धूळ आणि घाण आपल्या घरात इतरत्र पसरणार नाही

जेवणाची सुरवात देवाचे नामस्मरण करून करावे. तसेच शक्य असल्यास देवाला नैवेद्य दाखून जेवण करावे. आपल्या सर्व लोंकाना आणि प्राणी मित्रांना सुद्धा जेवण मिळावे यासाठी सुद्धा देवाकडे अवश्य प्रार्थना करावी. त्याच सोबत या प्रथ्वी तळावर कोणीही उपाशी झोपूनये अशी पार्थना नक्की करावी.

जर का आपण घरात जेवण करत असताना काही गोष्टी नक्की पाळाव्यात जसेकी रोज घरात जेवण करताना आपले मुख म्हणजे तोड हे उत्तर किंवा पूर्व दिशेला राहील याची काळजी घ्यावी. शक्यतो पश्चिम दिशेला तोंड करून जेवण करू नये. तसेच घरात जेवण करताना कधीही पायात बूट किंवा चप्पल घालून जेवण करुनये.

जेवण शांततेत करावे. सर्व जण एकत्र मिळून जेवण करत असलो तरी सुद्धा जास्त बडबड करत बसूनये. तसेच राग किंवा संताप आलेला असेल तर त्या वेळेस लगेच जेवण करायला बसू नये. रागाच्या भरात जेवण केले कधीच पचत नाही किंबहुना त्या पासून चांगली ऊर्जा आपल्या शिरीराल मिळत नाही.

शक्य असेल तर दिवसातून एक वेळेचे जेवण हे कुटुंबातील सर्वाना एकत्र करून जेवावे. तसेच जेवण हे शक्यतो स्वयंपाक घरात बसून जेवावे. अशी मान्यता आहे. स्वयपांक घरात बसून जेवण केल्यास राहू ग्रह शांत राहतो. जर का कुंडलीतील राहू ग्रह शांत असेल तर आपल्यावर आणि आपल्या परिवारातील व्यक्तीवर वाईट संकटे येत नाहीत.

जेवण करताना एका हातानी ताट धरून जेवण करू नये. अशी मान्यता आहे कि ते अन्न आपल्या शरीराला कधीच लागत नाही. भोजन झाल्यावर ताटात हातकधीच धुऊ नये. तसेच समोर आलेले अन्नाला कधीच नावे ठेऊनये.

अन्नाची नासाडी होउनये म्हणून जितके अन्न हवे आहे. तितकेच अन्न ताटात घ्यावे. अन्नाची नासाडी करुनये. तसेच जेवण कधीही बेड वर बसून करू नये.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही.धन्यवाद.