धार्मिक

घरात पैसा टिकत नाही ? पैसाच पैसा येईल गुळाचा हा उपाय करा…

मित्रांनो आपल्या रोजच्या जीवनात गुळाला खूप महत्व आहे.हिवाळ्यात तर गुळाला खूप महत्व आहे. गुळाचे खूप फायदे आहेत. गुल हा आपली प्रतिकार शक्ती वाढवते आणि आपले वजन कमी करण्यास मदत करते.गुळामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आहेत. गुळामध्ये मॅग्नेशियम , फॉस्फरस आणि लोह असे अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.

मित्रांनो गुळाला आपल्या घरात जेवढे महत्व आहे . तसेच त्याच गुळाचा वापर करून आपण आपल्या घरातील पैसा वाचवू शकतो.तुमच्या घरात जर पैसा जर टिकत नसेल तर तुम्ही गुळाचा उपाय करून तुमच्या घरातील पैसे हा टिकवू शकता. तर मित्रानो गुळाचा उपाय कोणता आहे ते आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात.

जोतिषशास्त्रात गुळाला खूप महत्व दिले आहे. गुळ हा सूर्याचा कारक मानला जाते.आपल्या पत्रिकेत जर सूर्याच स्थान जर खराब असेल तर आपल्याला खूप अडचणींना सामोरे जावे लागते. तसेचग सूर्य ग्रहा बद्दल च्या काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो.

मित्रांनो तुमच्या पत्रिकेत जर सूर्य ग्रह कमजोर असेल तर त्यासाठी कोणतेही काम हाती घेतले असेल तर ते करण्याचा आधी गुळाचा एक तुकडा खाऊन मगच त्या कामाला सुरुवात करा म्हणजे तुमचे काम पूर्ण होईल.दुसरा उपाय हा आहे कि तुमचे काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही एक गुळाचा तुकडा वाहत्या पाण्यात सोडून द्या असं केल्यास तुम्ही हाती घेतलेलं काम पूर्ण होईल आणि तुम्हाला त्या कमला कोणतीही अडचण येणार नाही.

तुम्हाला जर तुमच्या नोकरीत अडचण येत असेल किंवा नोकरीत बढती हवी असल्यास तुम्ही एका रविवारी दोन किलो गूळ हा एका लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या बेडरूममध्ये ठेवावा असं केल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि ताणतणाव दूर होण्यास देखील मदत होईल. तसेच महत्वाच्या कमला जाताना एक गुळाचा खडा खाऊन त्यावर पाणी पिऊन घराच्या बाहेर जावे असं केल्यास तुमची कामे पूर्ण होण्यास मदत होईल.

मित्रानो गुळ हा आपण रोज थोडा थोडा असा रोज खात राहिलात तर तुमच्या घरात पैश्याची आवक वाढेल तसेच आलेला पैसे टिकण्यास देखील मदत होईल .तसेच जर तुम्हाला रात्री नीट झोप लागत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक गुळाचा खडा खाऊन पाणी पिऊन झोपावे . तुम्हाला शांत झोप लागेल. तर मित्रानो हे गुळाचे उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.