फ्रिज स्वच्छ करण्याची सोपी पद्धत. , An easy way to clean the fridge.
किचन टिप्स

फ्रिज स्वच्छ करण्याची सोपी पद्धत.

घरातील प्रत्येक वस्तू आपण स्वच्छ करत असतो. बऱ्याच वेळेस आपण घराची आलमारी सुद्धा स्वच्छ करतो. त्यातील सर्व कपडे कडून त्यांची योग्य घडी घालून पुन्हा आपण कपाटात ठेऊन देत असतो. ज्या प्रमाणे आपण सर्व गोष्टी स्वच्छ करतो त्याच प्रमाणे फ्रिज सुद्धा स्वच्छ करायला हवे. बऱ्याच लोकांचे म्हणे असते कि फ्रिज स्वच्छ करण्यसाठी बराच वेळ लागतो. आज आम्ही तुम्हला खुप सोप्या गोष्टी सगणार आहोत फ्रिज कसे स्वच्छ करायचे ते.

बऱ्याच वेळेस असे होते कि आपण फ्रिज मध्ये अनेक भाज्या ठेवतो काही वेळेस आपल्याकडून चुकून उघड्या ठेवल्या जातात. अशा वेळेस बऱ्याच दुसऱ्या वस्तुंना सुद्धा त्याचा वास लागतो आणि संपूर्ण फ्रिज मध्ये वास येण्यास सुरवात होते. असा वेळी आपल्या फ्रिज स्वच्छ करण्या शिवाय पर्याय नसतो. फ्रिज स्वच्छ करण्याची सोप्या टिप्स मुळे तुमचा वेळ सुद्धा कमी होईल आणि तुमचे फ्रिज सुद्धा स्वच्छ होईल.

रोज घर साफ करोत, नाहीतर आपल्या घरात कचरा तयार होईल आणि त्यानून घाण वास येण्यास सुरवात होईल. त्याच प्रमाणे जर का फ्रिज काही दिवसानंतर साफ सफाई केली नाही तर त्यातून सुद्धा दुर्गंध येण्यास सुरवात होईल. एक गोष्ट नक्की काळजी पूर्वक लक्षात ठेवा फ्रिज स्वच्छ करताना आपले फ्रिज बंद आहे ना याची खात्री करून घ्या. तसेच चालू फ्रिज जास्त वेळ उघडे रहाणार नाही याची खात्री करून घ्या.

फ्रिज मध्ये सर्वात लवकर दुर्गंध येतो तो म्हणजे बऱ्याच दिवसपूसन असलेले दुधाचे पदार्थ. बऱ्याच वेळेस असे होते कि आपण फ्रिज मध्ये कित्येक दिवस पनीर, चीज, दही, इत्यादी गोष्टी खराब होऊनये म्हणून ठेऊन देतो पण त्याकडे काही दिवसानी लक्ष देणे सोडून दिल्यामुळे काही दिवसानंतर त्याला फंगस होऊन इतर सुद्धा पदार्थ खराब होण्यास सुरवात होते. त्यामुळे दुधाचे पदार्थवर एक्सपायरी कधी होणार आहे हे पाहूनच फ्रिज मध्ये ठेवा.

फ्रिज मधून वास येत असेल तर त्या मध्ये लिबू चिरून फ्रिजच्या विविध कोप्यात ठेऊन द्या. तसेच बेकिंग सोडा सुद्धा तुम्ही फ्रिज मध्ये ठेऊ शकतात. यामुळे फ्रिज मधील दुर्गंध कमी होण्यास मदत होईल. तसेच जर का तुम्ही भाजी धावून फ्रिज मध्ये ठेवत असाल तर धुतलेले पाणी सुकेपर्यंत थांबा, नंतर फ्रिज मध्ये ठेवा.

हे पण वाचा : या टिप्स उपयोगात आना जेवणाची चव कधीच कमी होणार नाही.

उरलेले अन्न जर का तुम्ही फ्रिज मध्ये ठेवणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. फ्रिज मध्ये अन्न ठेवताना त्यावर काहीतरी झकून ठेवा. नाहीतर संपूर्ण फ्रिज मध्ये वास येईल. तसेच कोणतेही उरलेले अन्न जास्त काळ फ्रिज मध्ये रहाणार नाही याची काळजी घेत जा . तसेच मीठ टाकून कोमट पाणी तयार करा तीन पाण्याने फ्रिज पासून घ्या. त्या नंतर काही वेळ फ्रिज उघडे ठेवा.

काही जुने किंवा सिंगल डोर फ्रिज मध्ये जास्त प्रमाणत बर्फ तयार होतो. अशा वेळी बर्फ वितळे पर्यंत फ्रिज चालू करू नका. त्यानतंर एक एक वस्तू पुन्हात्यात ठेऊन नंतर फ्रिज चालू करा.