धार्मिक

घरात पैसे टिकत नाही तर टाळा ,या नकळत घडणाऱ्या पाच गोष्टी…

मित्रानो सगळ्यांनाच वाटतं कि आपल्याकडे भरपूर पैसे असावा. आपल्या घरी नेहमी लक्ष्मी चा वास असावा. आपल्यावर नेहमी लक्ष्मी प्रसन्न असावी.काही लोकांच्या घरी तर भरपूर पैसा येतो पण तो टिकत नाही ,तो आलेला पैसा सगळा खर्च होतो. कारण आपण कळत-नकळत अश्या काही चुका करतो किंवा अशी काही कामे करतो त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही किंवा पैसे खर्च होतात.

मित्रानो लक्ष्मी मातेला ज्या गोष्टी केल्यावर राग येतो त्या गोष्टी आपण करायच्या नाहीत , म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होणार नाही. लक्ष्मी माता हि आपल्यावर नेहमी प्रसन्न व्हावी किंवा माता लक्ष्मी आपापल्या घरी टिकून राहावी म्हणून आपण या ५ गोष्टी करणं टाळायच्या आहेत.

तर मित्रानो आता आपण अश्या कोणत्या चुका आहेत ज्यामुळे घरात पैसे टिकत नाहीत अश्या गोष्टी ची माहिती घेऊयात.

१)मित्रानो आपण नेहमी शुभ काम करताना आपण उजवा हात वापरतो तर आपण नेहमी पैसे देताना किंवा घेताना आपण उजव्या हातानी द्यावेत आणि उजव्या हातांनीच पैसे घ्यावेत. आपण उजवा हात हा शुभ मानतो तर हे तुम्ही लक्षात ठेवा आपण पैसे देताना दावा हात वापरू नये असे मानतात तर असे कारण टाळा.

२)मित्रानो पैसे मोजताना आपण थुकी लावून पैसे मोजतो तर असे कारण टाळावे. माता लक्ष्मी ला आपण थुंकी लावून तो मोजतो असे करणे योग्य आहे का असे केल्यास माता लक्ष्मी चा अपमान होतो असे म्हणतात. त्यापेक्षा पाण्याचा वापर करू पैसे मोजता येतात तर हे लक्ष्यात ठेवा आणि हि गोष्ट टाळावी.

३)मित्रानो आपले जे ग्रंथ आहेत ते हि आपण वाचतो आणि वाचताना आपण पान बदलताना परत थुंकीचा वापर करतो. तर आपले महाभारत, रामायण, भगवद्गीता ,श्री शिवलीलामृत ,असे ग्रंथ आहेत ते वाचताना कधीच आपण थुंकी चा वापर करू नये असे म्हणले जाते , असे केल्यास माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होती असे मानतात.आपण थुंकी नाही लावली तरी आपण हि पाने बदलू शकतो तर थुंकी न लावता ग्रंथ वाचावा असे करणे योग्य असते.

४)मित्रानो आपल्याला सवय असते ती रविवारी नखे कापण्याची तर मित्रानो रविवारी नखे कापणे योग्य नसतात , तसेच नॆ कापल्यावर ती एका कागदात बांधावेत , नखे इतरत्र टाकू नयेत असे करणे टाळावे .

५)मित्रानो तुम्हाला पैसे मिळाल्यावर ते पैसे तुम्ही पहिल्यादा तुमच्या देवा समोर ठेवावेत असे केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होती असे म्हणतात . तसेच तुमच्या कष्टाचे पैसे मिळाल्यावर ते पैसे तुम्ही तुम्हाला मिळालेल्या दिवशी खर्च करू नकात ते पैसे तसेच एक देवास देवासमोर ठेवा मग दुसऱ्या दिवशी खर्च करा असे केल्यास माता लक्षुमी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात टिकून राहतो असे म्हणतात.

मित्रानो,तर या ५ गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या चुका परत परत करू नका लक्ष्मी तुमच्या घरात टिकून राहील.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.