आरोग्य

सोपा आयुर्वेदिक उपाय कावीळ बरा करण्यासाठी नक्की जाणून घ्या.

कावीळ या आजारापासून बरेच लोक त्रस्त असतात. विविध उपाय उपलब्ध आल्यामुळे काही प्रमाणत काविळीच्या त्रासापासून वाचता येते. पण इतके सारे उपाय जरी असले तरी आज ज्या उपया बद्दल आपण बोलणार आहोत. तो खुप सोपा आणि खुप उपयुक्त आहे. जर हा उपाय तुम्ही कावीळ च्या सुरुवातीला केल्यास त्याचा फायदा काही दिवसात तुम्हला दिसून येईल.

काही लोकांना कावीळ बद्दल जास्तप्रमाणात माहिती नसल्यामुळे ती झाली आहे कि नाही हेच कळत नाही. सुरवातीला कावीळ बद्दल जाणून घेऊ. कावीळला इंग्रजी Jaundice (जॉन्डिस ) असे म्हणतात. मुळात कावीळ दोन प्रकारत मोडते एक पिवळी कावीळ आणि पंढरी कावीळ. यांची लक्षणे जवळ पास सारखी असली तरी काही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यावरून कोणती कावीळ झाली आहे ते समजते.

पिवळ्या काविळीचे लक्षणे कोणती आहे ते जाणून घेऊ. पिवळ्या कावीळ मध्ये आपल्या शरीराचेबराचसा भाग हा पिवळा पडतो. डोळे, त्वचा नखे हि पिवळ्या रंगाची होणे. भूक मंदावणे म्हणजे भूक लागत नाही. तसेच जेवण करण्याची इच्छा कमी होत जाते. सतत मळमळणे किंवा उलट्या होणे. त्वचेला खाज येणे, तप येणे, संपूर्ण अंग दुखणे, लघवी गडद होणे, पोटात काही प्रमाण वेदना होणे. जवळपास हि लक्षणे आहेत पिवळ्या कावीळची.

पांढऱ्या काविळीची लक्षणे जवळ पास पिवळ्या कावीळ सारखीच आहेत. पण यामध्ये काही वेळेस डोळे आणि त्वचा पिवळी होते असे नाही.  सतत थकल्यासारखे वाटणे, जेवण न जाणे, काही प्रमाण सर्व जॉईंट दुखणे. सतत ताप येणे. पोट दुखणे यासारखी लक्षणे तुम्हला दिसून येतील. काही वेळेस हि लक्षणे लवकर दिसून सुद्धा येत नाही. असे सुद्धा काही वेळीस दिसुन आले आहे.

आज आपण कावीळ कमी बरा करण्याचा घरगुती उपाय पाहणार आहोत. पण हा उपाय सुरुवातीलाच केला तर त्याचा लाभ मिळतो. जास्त प्रमाणत कावीळ झाली असेल तर लगेच डॉक्टर (तज्ञ व्यक्तीना) दाखून घ्या. हा आजार (इन्फेकशन) वेळेत उपाय केल्यास लगेच बरे होण्यासारखे आहे. त्यामुळे कावीळ झाली असेल तर औषध घेण्यासाठी टाळाटाळ करू नका.

कावीळ होण्याचे मुख्य कारण म्हणजे दूषित अन्न आणि दूषित पाणी जास्त प्रमाणत त्यांचे सेवन केल्यास. पित्ताशय, यकृत आणि स्वादुपिंड यांच्याशी निगडित हा आजार आहे. त्यामुळे जास्त प्रमाण तुम्हला त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरशी संपर्कर करावा. कारण अशा वेळी घरगुती उपाय केल्याने फायदा होईल असे नाही.

पण जो काविळीचा आज उपाय पहाणार आहोत. त्या मध्ये आपल्या अर्ध केळ लागेल आणि खायचा चुना. अर्धा केळ उभे करून त्याचे दोन तुकडे कायचे आणि यामध्ये थोडा चुना लाचाच आहे. आणि त्याचे सेवन करायचे आहे. हा उपाय सकाळी उपाशी पोटी करायचा आहे. कावीळ झाल्यावर काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. जास्त मसाले पदार्थ शकतो काऊ नये. नोंव्हेज जेवण टाळावे. आणि जर का जास्त त्रास होत असेल तर योग्य तज्ञाचा सल्ला घेणे.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.