घरगुती उपाय

लवंगाचे हे ५ फायदे ऐकून तुम्हीही खाल दररोज लवंग.

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. लवंग हि दातदुखी तसेच श्वास दुर्गंधी दूर करतो हे सगळ्यांनाच माहित आहे. लवंगामध्ये लुझेनॉल ह्या तत्वामुळे लवंगाला विशेष अशी चव असते. प्रामुख्याने मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरली जाणारी हि लवंग कोणत्याही पदार्थमध्ये टाकली कि छान आणि वेगळा असा सुगंध येतो. लवंग हा फक्त मसाल्याचा पदार्थच नाही तर आपण आजच्या लेखामध्ये लवंगाचे ५ फायदे सांगणार आहोत जे वाचून तुम्ही देखील लवंगाचे सेवन करण्यास सुरवात कराल. चला तर पाहुयात लवंगाचे ते कोणते ५ फायदे आहेत.

लवंगाचे हे ५ फायदे

पहिला उपाय लवंगाच्या सेवनाने पोटाच्या आपल्या काही तक्ररी असतील जसे कि पोटदुखी, गॅस, उलट्या होणे किंवा मळमळणे हे कमी होते लवंगाच्या सेवनाने पचनक्रिया चांगली होते. तसेच पित्तावर तर हा एक खूप महत्वाचा उपाय आहे.

दुसरा उपाय म्हणजे लवंगाची पावडर हि फेसपॅक मध्ये आपण वापरू शकतो. तसेच ह्याची पावडर सोबत बेसन पीठ व मध ह्याचे मिश्रण करून चेहऱ्याला लावल्याने आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग सर्व निघून जातात व चेहरा ताज् व टवटवीत दिसतो. चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते.

तिसरा उपाय म्हणजे ज्यांचे केस गळती होतात किया ज्यांचे केस पातळ आहेत अश्या लोकांनी लवंगपासून बनलेल्या कंडिशनर व शाम्पू चा वापर करावं. लवंग आपण गरम पाण्यात टाकून त्या पाण्यानी केस धुवावेत अशे केल्याने केस काळेभोर व मजबूत होतात. लवंग आपल्या पॅराशूट तेलामध्ये मिसळून थोडं गरम करून घ्यावे व त्याने आपल्या डोक्याची मालिश करावी असे केल्याने देखील आपले केस खूप मजबूत होतात.

चौथा फायदा म्हणजे आपल्या तोंडाला जर वास येत असेल तर रोज सकाळी २ लवंगा तोंडात ठेवाव्यात एक महिना हा उपाय करा आपल्या तोंडाच्या दुर्गन्धेपासून आपली कायमची सुटका होईल.

पाचवा फायदा शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि डोकेदुखीमुळे होणारी वेदना कमी करण्यासाठी लवंग हे अतिशय फायदेशीर आहे. लवंगाच्या तेलाने किंवा फक्त लवंगाच्या वासाने आपले डोके दुखी थांबते. लवंगाचे तेल सांधेदुखीवर देखील खूप प्रभावी आहे. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.