वास्तुशास्त्रा

सकाळी उठताच किचनमधील ह्या गोष्टीला स्पर्श करा,अन्नपूर्णा नेहमी प्रसन्न राहील,गरिबी दूर होईल…

मित्रानो वास्तुशास्त्राप्रमाणे देवघरानंतर पवित्र असं आपलं स्वयंपाक घर मानलं जात, त्यामुळे ते नेहमी स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं , तसेच स्वयंपाकघरातच अन्नपूर्णा वास करत असते असं म्हणलं जात.

स्वयंपाघरात आपण स्वयंपाक बनवतो, तसेच तो बनवलेलं जेवण आपल्या घरातील मंडळी खात असतात आणि त्यांच्या बुद्धीचा विकास होत असतो. तसेच आपल्या घराची प्रगती याच किचनमधून होत असते. वास्तुशास्त्राप्रमाणे तर आपल्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा आणि अग्नी देवांचे वास्तव्य असते असे मानले जाते.

मित्रांनो त्यामुळे घरातील कर्त्या महिलेने सकाळी उठल्यावर हे एक काम त्या कर्त्या स्त्रीने केल्यास अन्नपूर्णा हि त्या घरात नेहमी वास करेल आणि प्रसन्न असेल, तसेच पैसे आणि धान्य या घरात कमी होणार नाही, तर मित्रानो आपण नेमकं काय करायचं ते जाणून घेऊयात.

सकाळी उठल्यावर स्वयंपाक घरात आल्यावर सगळ्यात आधी आपण गॅस शेगडीवर किंवा चुलीवर हळदीची पाणी शिंपडायचे आहे.असं केल्यास शुद्ध होत असं म्हणतात. तसेच मित्रानो रात्री झोपण्याच्या आगोदर गॅस शेगडी आणि गॅस ओटा स्वच्छ करून मग गॅसवर एक तवा ठेवायचा आणि त्यावर एक तमालपत्र ठेवून रात्रभर तसेच ठेवावं , असं केल्यास आपल्या घरातील निगेटिविटी निघून जात असते.

मित्रानो सकाळी उठल्यावर आपण तो रात्री तव्यावर ठेवलेले तमालपत्र आहे तो घेऊन तो तमालपत्र आपण सकाळी जाळायचा आहे.जर असं तुम्हला करता आलं नाही तर तुम्ही दुधाचे काही थेंब त्या गॅस शेगडीवर शिंपडायचे आहेत आणि हे दूध आपण अग्नी देवाला द्यायचे आहे, तसेच आपण सगळ्यात आधी जे काही बनवणार आहे चहा , नाश्ता असं काही जे पहिल्यांदा बनवणार आहे ते अग्नी देवाला देऊन गॅस शेगडीला नमस्कार करायचे आहे.

तसेच अग्नी देवाला आपण प्रार्थना करायची कि माझ्या घरात कधीच धन-धान्य कमी पडू नये, तसेच स्वयंपाक घरात जर ओट्यावर जर एक दिवा अन्नपूर्णा देवी साठी लावला तर आपल्या घरात धान्याची कधीच कमी भासत नाही, त्यामुळे एक दिवा हा अन्नपूर्णा देवीसाठी जरूर लावला पाहिजे. आपण रात्री झोपताना रोजच्या रोज गॅस शेगडीही स्वच्छ करूनच झोपले पाहिजे.

तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. त्यामुळे मित्रानो आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही , अन्नपूर्णा आणि अग्नी देवता तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहतील.