Tomorrow is Vatpoornima
धार्मिक

२४ जून गुरुवार वटपौणिमा, हि कामे चुकूनही करू नका.

उदय गुरवार असून जेष्ठ महिन्यातील पौर्णिमा आहे. या दिवशी वटसावित्री पौणिमा केली जाते. उद्याच्या दिवशी सौभाग्यवती महिला आपल्या घराजवळील वडाच्या झाडाची पूजा करतात. काही घरातील महिला दिवस भर उपवास ठेवतात तर काही घरातील महिला या दिवशी पूजा होईपर्यंत उपवास ठेवतात. उद्याचा दिवस सौभाग्यवती महिलासाठी खुप मत्वाचा आहे. आपल्या पतीचे दीर्घायुष्यासाठी तसेच सात जन्म हाच पती मिळावा म्हणून हि पूजा करतात.

या वर्षी वटसावित्री पौर्णिमा उदय म्हणजे २४ जूनला असणार आहे. हि पूजा करताना काही नयमचे पालन केले तर आपल्या आयुष्यात सुख समृद्धी व दीर्घ आयुष्य लाभते. उद्या गुरुवारी पूर्ण दिवस वटसावित्री पौणिमा करण्यासाठी मुहूर्त आहे. दिवस भरात कधी हि पूजा तुम्ही करू शकतात. उद्या पूजा करताना कोणत्या गोष्टी लागतात तसेच कोणत्या गोष्टी करायच्या नाही या बदल थोडी माहिती जाणून घेऊ.

हि पूजा काशी कारवी तर सकाळी लवकर उठून आपले नित्य नियमातील कामे पूर्ण करावी. त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून, व्रताचा संकल्प करून पूजेची तयारी करावी. वडाच्या झडाची पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य एका ताटलीत हळद, कुंकू, थोडी फुले, पांढरा दोरा, कापसाची व कापडाची वस्त्रे, धूप , दिवा, शुद्ध पाणी, दूध, कापूर, इत्यादी जर पहिली वटसावित्रि पौर्णिमा असेल तर एक नारळ, गहू, एक पीस, दक्षणा, असे ओटीचे ताट घेऊन पूजेला जायचे आहे.

वडाच्या झाडाच्या खाली जाऊन त्या ठिकाणी झडाची पूजा करावी त्यानतंर त्या झाडाला सात फेऱ्या माराव्यात त्या सोबत झाडाला दोरा गुंडाळावा, त्यानंतर वटसावित्रीची कथा वाचावी त्यानतंर पाच सौभाग्यवती स्त्रियांची ओटी भरावी. हा दिवस सौभाग्यवती स्त्रियांच्या जीवनातील हा एक दिवस खुप महत्वाचा आहे. या दिवशी स्त्रियांनी काही नियम पाळले तर त्याचे खुप चागले फळ त्याना मिळते.

या दिवशी घरातील वातावरण चागले व आनंदी ठेवावे, तसेच घरातील वातावरण खराब होईल असे कोणतेही काम करू नका. आपल्या पेक्षा वयानी मोठे आलेल्या व्यक्ती सोबत वाईट बोलू नका. घरात स्वच्छता ठेवावी ज्या ठिकाणी स्वच्छता आणि आनंदी वातावरण असते त्या ठिकाणी देवांचा आशीर्वाद असतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.