धार्मिक

वाईट लोकांचे चांगले व चांगल्या लोकांचे नेहमी वाईट का होते स्वामींनी दिले हे उत्तर

मित्रांनो तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का कि वाईट लोकांचे चांगले आणि चांगल्या लोकांचे वाईट का होते असा [प्रश्न तुम्हाला कधीना कधी तरी पडलाच असेल बरोबर. तर ह्याच प्रश्नावर आपण आजच्या लेखात आपण बोलणार आहोत म्हणून आजचा लेख तुम्ही शेवटपर्यत वाचा. मित्रांनो जी लोक कधी कधी खूप जिद्दीने काम करतात, कष्ट करतातकधीही कोणालाही फसवत नाही, त्यांच्या सोबतच लोक वाईट वागतात. त्यांच्यावर अन्याय होतो. आणि जे लोक दुसऱ्यांवर अन्याय करतात दुसऱ्यांशी वाईट वागतात त्यांच्याबरोबर मात्र लोकांची भरभराट होताना दिसते आणि हे बघून अर्थातच आपल्याला वाटायला लागते कि ह्या जगात न्याय आहे कि नाही.

आपण दुसऱ्याचे सुख पाहून दुःखी होतो, स्वतःला कमी लेखू लागतो एवढेच काय तर नशिबाला सुद्धा दोष देऊ लागतो, विशेषतः चांगली वागणारी लोक अपयशी होतात आणि वाईट वागणारे लोक यशस्वी होतात तेव्हा ह्या गोष्टी जास्त घडतात. ह्यावर एकदा महर्षी नारदांनी भगवान विष्णूंना विचारणा केली होती तेव्हा भगवान विष्णू काय म्हणाले हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

नारद मुनी म्हणतात कि देवा तुम्ही न्याय देताना कधी कधी चुकता असे मला वाटते. त्यावर देव नारदमुनींना म्हणतात नारदा तू मला माझी चूक दाखवून दे मी ती चूक नक्कीच दुरुस्त करतो. तेव्हा नारद मुनी म्हणाले देवा हे केवळ माझे म्हणणे नाही तर समस्त पृथ्वी वासीयांचे म्हणने आहे. एक उदाहरण देतो काही वेळापूर्वी एक गाय खड्यात अडकली होती, अश्या अवस्थेत एक चोर तिथून पळून जातो तो त्या गाईला तश्या अवस्थते पाहून देखील तो तिथून निघून जातो. शिवाय काही अंतर पुढे गेल्यावर त्याला सोन्याची थैली देखील मिळाली. ह्याउलट एक चांगला मनुष्य तिथून जाताना त्या गाईला पाहतो व तो त्या गाईला मदत करतो त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मात्र स्वतः मात्र खड्यात अडकतो, नारदमुनी म्हणतात हा कोणता न्याय आहे देवा.

ह्यावर विष्णू हसले व ते नारदाला उत्तर देत म्हणले दिसते तस नसते म्हणून तर जग फसते, तुला त्या चोराला मिळालेल्या मोहरा दिसल्या परंतु त्याचे काय नुकसान झाले हे तुला माहिती नाहीए, त्या चोराने जर गाईला वाचवलं असते तर ते पुण्य त्याच्या कामी आले असते त्याला पुण्याचा खजिना हाती लागणार होता मात्र तो मोहरांचा मागे जाऊन त्यावर त्याला समाधान मानावे लागले, ह्याउलट ज्या माणसाने गायला बाहेर काढले त्या व्यक्तीचा आज मृत्यू लिहलेला होता मात्र त्याच्या ह्या पुण्यकर्मामुळे त्याचा मृत्यू न होता तो फक्त खड्यात पडण्याच्या संकटात निभावला अंगाला चिखल लागला आणि मृत्यू टळला.

देव म्हणतात आपण प्राप्त परस्थीवर मत देऊन मोकळे होतो मात्र मला प्रेत्येक जिवाच्या वर्तमानाचीच नव्हे तर त्यांच्या भविष्याची देखील काळजी घ्यावी लागते, आणि त्यांच्या कर्मानुसारच त्यांना फळ द्यावं लागते. मित्रांनो ह्या गोष्टीमागे तात्पर्य हेच कि आपल्या बाबतीत हि काही वाईट आणि वाईट वागणाऱ्यांच्या बाबतीत काही चांगले घडताना दिसले तर नाराज होऊ नका. त्यांनी कोणतातरी खजिना गमावला आहे हे लक्षात घ्या व तुम्ही तुमच्या वरच्या कोणतातरी संकटावर मात केली आहे हे लक्षात घ्या.

म्हणून सत्कर्म करत राहा चांगल्या कर्माची फळे हि चांगलीच मिळतात. जर तुम्हाला आजचा लेख आवडला असेल तर लाइक अवश्य करा. तसेच हि कथा तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर देखील करा, धन्यवाद.