गूळ आणि फुटाणे खाण्याचे फायदे
लाईफस्टाईल

सकाळी उठल्यावर उपाशी पोटी खा गूळ आणि फुटाणे; १० पेक्षा जास्त रोग मुळापासून होतील बरे.

आज आपण गूळ आणि फुटाणे खाण्याचे फायदे पाहणार आहोत. खुप लोकांना माहित नसेल कि गूळ आणि फुटाणे उपाशी पोटी खाल्यावर त्याचे खुप फायदे आहेत. बरेच लोक जेवण झाल्यावर गूळचा एका तुकडा खात असतात, कारण जेवण झलयवर काहीतरी गोड खायला पाहिजेय म्हणून. तसेच गूळ हा पचन क्रिया चांगली होण्यास मदत करतो. गूळ हा शरीरा साठी खुप पोषक घटक आहे.

बरेच लोकं असे सुद्धा म्हणतात कि साखरे पेक्षा गूळ हा खाणे चांगले असते कारण गुळा मध्ये पोटॅशियम सल्फर, फॉस्फरस, लोह, आणि कॅल्शियम इत्यादी गोष्टीचे पण चांगले असते. तर साखरे मधून या सर्व गोष्टी जवळ पास नष्ट झालेल्या असतात.साखर जास्त प्रमाणत खाल्यास त्याचे वाईट परिणाम दिसून येतात; त्याच प्रमाणे साखरेत कुठलेही चांगले गुणधर्म दिसून येत नाही.

गूळ आणि फुटाणे खाण्याचे फायदे

गूळ हा शरीरा साठी खुप उपयुक्त आहे त्या मध्ये बरेच व्हिटॅमिन असून त्याचे फायदे आपल्याला मिळत असतात. गूळ खाल्याने आपल्याला शरीराला व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणत मिळते. तुम्हला हे माहित असेल कि भारतीय संस्कृतीत देवाणा प्रसाद म्हणून आपण गुळ आणि फुटाणे दाखवत असे त्यामुळे वरवर गुळ आणि फुटाणे खाल्ले जात असे त्या वेळी नकळत का होईना त्याना त्याचा फायदा होत असे.

या दोनी गोष्टी एकत्र खाल्याने त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येतात. त्यात खुप प्रकारचे व्हिटॅमिन, असल्यामुळे आपल्या होणारे आजार मुळापासून बरे होण्यास मदत होते. मग आपण पाह्य्यात गूळ आणि फुटाणे एकत्र खाल्याने त्याचे कोणते फायदे होतात.

ज्या लोकांना पोटात गँस सारखा होत असतो त्यानी जेवणा नंतर गूळ आणि फुटाणे खावे यामुळे अन्न पचन क्रिया सुलभ होते व गॅसेस कमी होतात. तसेच गूळ खाल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. ज्या लोकांना वारंवार अशक्तपणा जाणवतो त्यानी गुळ आणि फुटाणे खावे, कारण लोह चे प्रमाण गुळा मध्ये जास्त असते. मुख्य म्हणजे महिलांनी गूळ आणि फुटाणे याचे सेवन करणे खुप चांगले आहे.

आपली शरीराची त्वचा चांगली होण्यास मदत होते. कारण गूळ हा रक्त सुद्ध करण्याचे काम करत असतो. रक्तातील अनावश्यक घटक कडून टाकण्याचे काम करतो; त्यामुळे आपली त्वचा चांगली होऊन त्वचा शी संबंधित आजार कमी होतात. त्याच बरोबर प्पिपल्स कमी होऊन आपल्या चाहिऱ्यावरती एक प्रकारचे तेज निर्माण होते.

गूळ आणि फुटाणे चे महत्व

सर्दी आणि खोकला यापासून अराम हवा असेल तर गूळ आणि फुटाणे खावेत. त्याच बरोबर आपली बुद्धी चांगली करण्यासाठी पण याच उपयोग होतो, या मध्ये असणारे व्हिटॅमिन बी स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच दात मजबूत कण्यासाठी सुद्धा मदत होते. दाताला मजबूत करण्यासाठी लागळणारे फॉस्फरस या मध्ये असते.

लठ्ठ पण नियत्रंत करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होते. गूळ आणि फुटाणे एकात खाल्याने मेटॅबॉलिझम ची प्रकारीया चांगले होते, आपली चयापचय प्रक्रिया चांगली होते यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. गूळ आणि फुटाणे खळ्याने कॅल्शियम चे प्रमाण चांगले होऊन आपले हाडे मजबूत होतात.

गूळ आणि फुटाणे खाण्याचे फायदे काय आहते हे तुम्हला काळे असलेलं त्या सोबत महत्वाचे म्हणजे हिमोग्लोबीन चांगले होण्यास मदत होते. गुळाचा चहा पिल्याने सुद्धा खुप चांगला फायदा होतो

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या