२५ ऑगस्ट गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुलाबाच्या फुलांचा उपाय गुपचूप करा. पैशाने घर भरून जाईल.
धार्मिक

२५ ऑगस्ट गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुलाबाच्या फुलांचा उपाय गुपचूप करा. पैशाने घर भरून जाईल.

येत्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यसाठी छोटे छोटे उपाय केल्यास त्याचा लाभ नक्की मिळतो. पवित्र श्रावण महिन्यात गुरुवारी सुंदर योग आलेला आहे. सकाळी ६.२४ मिनिटापासून सुरू होऊन सायंकाळी ४. १५ मिनिटापर्यंतहि तिथी असणार आहे. श्रावण कृष्ण त्रियोदशी तिथी असणारा आहे. गुरुपुष्यामृत योगा दिवशी छोटे उपाय केल्यास त्याचा लाभ नक्की मिळेल.

पुष्य नक्षत्र हे आठवे सर्वात चागले नक्षत्र आहेत. हिंदू धर्म शास्त्रात सर्व नक्षत्र मिळून सत्तावीस आहेत त्यापैकी पुष्य नक्षत्र सर्वात चांगले मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कोणतेही धार्मिक कार्य केल्यास त्याचे लाभ नक्की मिळतात. माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. यामुळे आपल्या हातून चांगले कार्य सतत होत राहते.

या दिवशी बरेच लोक अनेक वस्तू खरेदी करताना आपल्या नेहमी दिसून येतात. गुरुपुष्यामृतचा योग हा धन आणि सुख समृद्धीचा कारक आहे. म्हणूच याच दिवशी अनेक लोक सोने, चांदी, किंवा घरात अनेक वस्तू खरेदी करून घेऊन येतात. गुरुपुष्यामृतचा योग शुभ असल्यामुळे याच दिवशी तुम्ही नवीन उदयोग , नवीन एखादे काम सुरु करू शकतात, तसेच नवीन गडी किंवा घर सुद्धा घेऊ शकतात.

हे पण वाचा :- खरच वजन वाढते का भात खाल्याने? भात खाण्याचे फायदे काय आहेत.

गुरुपुष्यामृतचा योग शुभ असल्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणकोणते उपाय केले पाहिजे तसेच आपल्या संपत्ती मध्ये वाढ होण्यसाठी या शुभ मुहूर्तावर काय केले पाहिजे या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिशी लक्ष्मीच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची पूजा अवश्य करा. तसेच याच दिवशी सकाळी लवकर उठून मुख्य दरवाज्यावरती तोरण बांधावे. अंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे. जर का हे शक्य नसेल तर फुलांचे तोरण केले तरी चालते. तसेच दरवाज्या समोर रंगोली वाढावी. असे केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारत्मक ऊर्जा घरात येते. आणि ज्या ठिकाणी सकारत्मक ऊर्जा असते स्वच्छता असते आहे, अशा ठिकाणी माता लक्ष्मी जास्त काळ रहाते. तसेच माता लक्ष्मी चा मंत्र जप सुद्धा करावा “ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः॥” कमी कमी एकशे आठ वेळा.

घरात सुख समृद्धी तसेच धन धान्य संपत्ती यांची वृद्धी होण्यसाठी घरात गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी श्री यंत्र नक्की स्थापना करा. यामुळे अनके सकारत्मक गोष्टी आपल्या घरात होऊ शकतात. तसेच नवनवीन धन प्राप्तीचे मार्ग आपल्याला दिसून येतात. अशा अशा मुळे पैसा कधीच कमी पडत नाही. तसेच बरेच लोक याच दिवशी दक्षिणावर्ती शंख देवघरात त्याची स्थापना करतात. यामुळे सुद्धा धन लाभ होतात.

घरामध्ये आलेला पैसा टिकून रहात नाही. आलेला पैसा लगेच घराबाहेर निघून जात असेल. कोणत्याही कामसाठी अडचणी येत असेल तर या दिवशी एक छोटासा उपाय तुम्ही करू शकतात. लाल चंदन आपल्या दुकानातून आणायचे आहे. कोणत्याही पूजेचे साहित्य मिळणाऱ्या दुकानात मिळून जाईल. लाल चंदन घेऊन देवघरात एक पाठ ठेऊन त्यावर पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेऊन त्यावर हे चंदन ठेवायचे आहे. त्याची माता लक्ष्मीची पूजाकरायची आहे. शेवटी त्याची पुरचुंडी बांधून आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला हि पुरचुंडी ठेवायची आहे. यामुळे सुद्धा तुम्हला लाभ होऊ शकतो.

हे पण वाचा :- धनाची देवता कुबेर यंत्र, घरात या ठिकाणी ठेवा. घरातील आर्थिक समस्या संपेल.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.